पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद- तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसला तेलंगणातील हैदराबादमधील सिंकदराबाद रेल्वे स्थानकात दाखवला हिरवा झेंडा
Posted On:
08 APR 2023 5:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील हैदराबादमधील सिंकदराबाद रेल्वे स्थानकात सिकंदराबाद- तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसला आज हिरवा झेंडा दाखवला. सिंकदराबाद रेल्वे स्थानकात आल्यानंतर पंतप्रधानांनी सिकंदराबाद- तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि गाडीच्या कर्मचारी वर्गाशी तसेच लहान मुलांशी संवाद साधला.
पंतप्रधानांचा ट्विटर संदेश –
“सिकंदराबाद आणि तिरुपती यांच्या कनेक्टीव्हिटीत वाढ करणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची झेंडा दाखवून सुरुवात.तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या जनतेचे ही गाडी सुरू झाल्याबद्दल मी अभिनंदन करतो.”
माहिती तंत्रज्ञानाचे शहर अशी ओळख असलेले हैदराबाद आणि भगवान वेंकटेश्वराचे धाम तिरुपती यांना जोडणारी सिकंदराबाद- तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेस ही अवघ्या तीन महिन्यांच्या काळात तेलंगणातून सुरू झालेली दुसरी वंदे भारत रेल्वेगाडी आहे. या रेल्वेगाडीमुळे दोन शहरांमधल्या प्रवासासाठी लागणारा वेळ जवळपास साडेतीन तासांनी कमी होणार असून त्याचा फायदा यात्रेकरूंना होईल.
या कार्यक्रमाला पंतप्रधानांसह तेलंगणच्या राज्यपाल डॉ. तमिळसाई सौंदरराजन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी उपस्थित होते.
***
N.Chitale/R.Bedekar/Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1914912)
Visitor Counter : 186
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu