पंतप्रधान कार्यालय
भारतीय क्रिकेटपटू सलीम दुराणी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
02 APR 2023 10:30AM by PIB Mumbai
भारतीय क्रिकेटपटू सलीम दुराणी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे
पंतप्रधानांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे की
"सलीम दुराणी जी क्रिकेटमधील आख्यायिका असून अत्यंत सुपरिचित म्हणून गणले जात. जागतिक पटलावर क्रिकेटमध्ये भारताच्या उदयात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. मैदानात आणि मैदानाबाहेर ते त्यांच्या शैलीसाठी परिचित होते. त्यांच्या निधनाने व्यथित झालो आहे . त्यांचे कुटुंबिय आणि मित्रपरिवाराचं आपण सांत्वन करतो . त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”
“सलीम दुराणी जी यांचे गुजरात सोबत फार जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. काही वर्ष ते सौराष्ट्र आणि गुजरात साठी खेळले होते. ते गुजरात मध्ये वास्तव्यास होते . मला त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती आणि त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा माझ्यावर फार प्रभाव पडला होता. त्यांची उणीव नक्कीच भासत राहील.''
माजी भारतीय क्रिकेटपटू सलीम दुराणी यांच्यासोबत पूर्वी झालेल्या भेटींची काही क्षणचित्रही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली.
***
Jaydevi PS/S.Naik/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1913048)
आगंतुक पटल : 193
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam