पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशातील भोपाळ इथे संयुक्त कमांडर्स परिषदेत पंतप्रधान सहभागी
प्रविष्टि तिथि:
01 APR 2023 8:36PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशातील भोपाळ इथे संयुक्त कमांडर्स परिषदेत सहभागी झाले.
‘सज्ज, पुनरुत्थानक्षम आणि संबंधित’ ही सैन्य दलातील कमांडर्सच्या तीन दिवसीय परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षा, सैन्य दलांतील समन्वय आणि प्रत्येक दल प्रमुखाच्या अधिकारात लष्कर, नौदल आणि वायूदलाच्या तुकड्यांचा समावेश या विषयांशी संबंधित बाबींवर चर्चा झाली. ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने जाण्यासाठी सैन्य दलांची तयारी आणि प्रगतीचा आढावा या परिषदेत घेण्यात आला.
तिन्ही सैन्य दलांचे कमांडर्स आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते. तिन्ही दलांच्या जवानांसाठी समावेशक, अनौपचारिक सत्रांचेही परिषदेत आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये या जवानांचा सक्रीय सहभाग होता.
पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात सांगितले, “आज भोपाळमध्ये संयुक्त कमांडर्स परिषदेत भाग घेतला. भारताच्या सुरक्षाविषयक उपकरणांमध्ये कशा प्रकारे वाढ करता येईल यावर आम्ही व्यापक चर्चा केली.”
***
S.Patil/R.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1912970)
आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam