पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण निर्यात आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा

प्रविष्टि तिथि: 01 APR 2023 9:10AM by PIB Mumbai

भारताच्या संरक्षण निर्यातीने 2022-2023 या आर्थिक वर्षात 15,920 कोटी रुपयांचा 

उच्चांक गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून दिलेल्या माहितीच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले:

"उत्कृष्ट!  भारताच्या प्रतिभेचे स्पष्ट प्रकटीकरण आणि ‘मेक इन इंडिया’ बद्दलचा उत्साह. गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रातील सुधारणांची चांगली फळे दिसू लागल्याचेही हे निदर्शक आहे.  आमचे सरकार भारताला संरक्षण उत्पादन केंद्र बनवण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देत राहील."

*****

MI/Vinayak /CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1912805) आगंतुक पटल : 181
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam