पंतप्रधान कार्यालय
'मन की बात' कार्यक्रम, समाजाच्या अगदी शेवटच्या स्तरावर बदल घडवून आणणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींचा कौतुकोत्सव : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
31 MAR 2023 9:08AM by PIB Mumbai
न्यूज 18 रायझिंग इंडिया परिषदेत उपराष्ट्रपतींच्या हस्ते “व्हॉइस ऑफ इंडिया-मोदी अँड हिज ट्रान्सफॉर्मेटिव्ह मन की बात” या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएनएन न्यूज 18 नेटवर्कचे कौतुक केले आहे. या पुस्तकात उल्लेखनीय व्यक्तींच्या कार्याची आणि त्यांच्या कार्याच्या प्रभावाची ओळख करून देण्यात आली आहे.
उपराष्ट्रपतींच्या ट्विटला प्रतिसाद देताना नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले:
"#MannKiBaat मधील सर्वात सुंदर भाग म्हणजे या कार्यक्रमात तळागाळात बदल घडवणाऱ्या व्यक्तींचे कौतुक करण्याची पद्धती. हा कार्यक्रम शंभर भाग पूर्ण करत असताना, मी यात उल्लेखनीय व्यक्तींच्या कार्याची आणि त्यांच्या कार्याच्या प्रभावाची ओळख करून देण्यासाठी @CNNnews18 सारख्या प्रयत्नांची प्रशंसा करतो."
***
Sonal T/S. Mukhedkar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1912512)
आगंतुक पटल : 184
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam