गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिना’ निमित्त कचरामुक्त शहरांसाठी रॅली

प्रविष्टि तिथि: 28 MAR 2023 2:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 मार्च 2023

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवसानिमित्ताने स्वच्छोत्सवा अंतर्गत कचरामुक्त शहरांसाठी रॅलीचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा 2023 दिनाच्या संकल्पनेच्या अनुषंगाने - 'कचरा कमी करणे आणि कचरा व्यवस्थापनासाठी शाश्वत तसेच पर्यावरणीयदृष्ट्या चांगल्या पद्धती साध्य करणे' हा स्वच्छोत्सवाचा उद्देश आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी आणि संयुक्त राष्ट्राचे निवासी समन्वयक शॉम्बी शार्प यांच्या उपस्थितीत, 350 हून अधिक प्रतिनिधी यामधे महापौर, आयुक्त, अभियान संचालक, व्यवसाय आणि तंत्रज्ञान तज्ञ, स्वच्छता क्षेत्रातील मान्यवर महिला आणि तरुण, तांत्रिक संस्था, विकास भागीदार यांची कार्यक्रमास उपस्थित राहणे अपेक्षित आहे.

'महिलांच्या नेतृत्वाखालील स्वच्छतोस्वा' ची सुरुवात स्वच्छ मशाल फेरीने होईल. 29, 30, 31 मार्च 2023 रोजी कचरामुक्त शहरांसाठी यामाध्यमातून नागरिक फेरी काढतील. त्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (यूएलबी) प्रत्येक प्रभागात जलकुंभ, रेल्वे मार्ग, सार्वजनिक शौचालये आदी सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या भूखंडांवर स्वच्छता मोहीम राबविली जाईल. मशाल फेरीसाठी 2000 हून अधिक शहरे आधीच तयार झाली आहेत.

स्वच्छोत्सव - आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस: कचरामुक्त शहरांसाठीच्या रॅलीमध्ये कचरामुक्त शहरांमध्ये एकतानता,जीएफसीसाठी महिला आणि युवक, जीएफसीसाठी व्यवसाय आणि तंत्रज्ञान तसेच महापौरांशी चर्चा आणि सर्वोत्तम पद्धतींचे सादरीकरण यांचा यात समावेश आहे. हा कार्यक्रम एमओएचयुए द्वारे जीआयझेड, फेडरल मिनिस्ट्री फॉर द एनव्हायर्नमेंट, निसर्ग संवर्धन, आण्विक सुरक्षा आणि ग्राहक संरक्षण, युएनईपीच्या सहकार्याने आयोजित केला जाईल.

महिलांच्या नेतृत्वाखालील तीन आठवड्यांच्या स्वच्छोत्सव या स्वच्छता मोहिमेची सुरुवात हरदीप पुरी यांनी 08 मार्च 2023 रोजी केली. स्वच्छता क्षेत्रातील महिलांपासून ते  महिलांच्या नेतृत्वाखालील स्वच्छतेकडे संक्रमण याची नोंद घेणे आणि गौरव करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. तीन आठवड्यांच्या मोहिमेची सांगता 30 मार्च 2023 रोजी असणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवसा’च्या पार्श्वभूमीवर 29 मार्च 2023 रोजी स्वच्छोत्सव कार्यक्रमात होईल. 

या अभियानांतर्गत, शहरातील स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या महिला उद्योजक किंवा महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांना मान्यता देण्याकरता महिला आयकॉन्स लीडिंग स्वच्छता (WINS) पुरस्कार 2023 च्या पहिल्या आवृत्तीची घोषणा करण्यात आली होती.

S.Thakur/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1911402) आगंतुक पटल : 326
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada