पंतप्रधान कार्यालय
कांचीपुरम येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील मृतांप्रती पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख
पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी मधून प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची आणि गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत केली जाहीर
Posted On:
22 MAR 2023 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2023
कांचीपुरम येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील मृतांप्रती पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी मधून प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकाला दोन लाख रुपयांची आणि गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत, पंतप्रधानांनी घोषित केली आहे.
पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणतात:-
"कांचीपुरम इथल्या फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेनं खूप व्यथित झालो आहे. शोकग्रस्त कुटुंबियांचं मी सांत्वन करतो. जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकाला दोन लाख रुपये तर जखमीला प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत, पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी मधून दिली जाईल."
* * *
S.Kane/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1909747)
अभ्यागत कक्ष : 196
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam