आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

'प्रत्येक नागरिकापर्यंत सार्वत्रिक आरोग्य सेवा पोचवणे' या डिजिटल आरोग्य सेवेवरील जागतिक परिषदेला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी केले संबोधित

Posted On: 20 MAR 2023 4:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2023

 

"आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या व्यवस्थेत क्रांतिकारी बदल करण्याची क्षमता डिजिटल व्यवस्थेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने डिजिटल आरोग्यावरील संस्थात्मक आराखडा घडवण्यासाठी जागतिक उपक्रम सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या आराखड्यामुळे डिजिटल हेल्थसाठी जागतिक स्तरावर चाललेले प्रयत्न  एका छताखाली आणून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी डिजिटल सोल्युशन्सचा वाढता वापर करता येईल. आरोग्य सेवेचा आवाका आणि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने  इतर  देशांच्या सहकार्याने  विखुरलेल्या आरोग्य सुविधा या आरोग्य सेवेच्या एकसंध व्यवस्थेकडे ( ‘Silos to Systems’)   नेण्याची ही वेळ आहे.",  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी आज हे प्रतिपादन केले.'

डॉ. मांडविया हे सार्वत्रिक आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत नेणे'  नामक  डिजिटल हेल्थ या विषयावरील भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली जागतिक आरोग्य संस्था नैऋत्य आशिया विभाग (साउथ वेस्ट आशिया रिजन) आणि भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते.

डिजिटल आरोग्याचे महत्त्व विशद करत मांडविया म्हणाले की आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या बाबतीत डिजिटल आरोग्य ही मोठी मदतीची बाब आहे आणि सार्वत्रिक आरोग्य सेवेचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची पूर्ण क्षमता असलेली अशी ही व्यवस्था आहे.

डिजिटल आरोग्यसेवा जागतिक स्तरावर नेण्यात तसेच आरोग्य सेवांना जगभरातून विशेषतः कमी आणि मध्यम उत्पन्न गटात असणाऱ्या देशांना डिजिटल सेवांचा पर्याय  या बाबतीत असणाऱ्या आव्हानांचा उल्लेख करत आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की "वसुधैव कुटुंबकम या आपल्या विचारांशी निगडित भारताने कोविन , ई-संजीवनी आणि आरोग्य सेतू अशी  ॲप्स  डिजिटल सार्वजनिक आरोग्यासाठी तयार केली.  ही गोष्ट आमची सार्वजनिक जागतिक आरोग्याप्रति असणारी कटीबद्धता आणि आव्हानात्मक आरोग्य सेवा सर्वदूर नेण्याची कळकळ दाखवते. " सार्वत्रिक आरोग्य सेवेच्या बाबतीत भारताच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करत आरोग्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या आरोग्य- उपक्रमाचा पाया हा डिजिटल शोधांनी घातल्याचे नमूद केले . त्यांनी प्रजनन बाल आरोग्य निगा (  चाइल्ड प्रॉडक्टिव्ह चाइल्ड हेल्थकेअर),  नि-क्षय हा क्षयाला आळा घालणारा कार्यक्रम आणि  एकात्मिक रुग्णसेवा व्यवस्था (  इंटिग्रेटेड डिसीज सर्वेस सिस्टीम ) अशा ॲप्सचा उल्लेख केला.

महामारीच्या काळात भारताने डिजिटल आरोग्य सेवेकडे दिलेले लक्ष हे मैलाचा दगड ठरला. त्यामुळे आरोग्य सेवेकडून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचु शकणाऱ्या प्रदीर्घ स्तरावर आरोग्य सेवा  नेणे साध्य करता आले.

ई-संजीवनी या दूरध्वनीवरून उपचारासंबंधी सल्ला देणाऱ्या ॲपने शंभर दशलक्ष टेली कन्सल्टेशन चा आकडा ओलांडला. लस व्यवस्थापनाने 2.2 मिलियन लसामात्रा  दिल्या याचा उल्लेख करत मांडविया यांनी पंतप्रधान आरोग्य योजनेने 500 दशलक्ष नागरिकांना विनामूल्य कॅशलेस आरोग्य विमा पुरवला असे सांगून आरोग्य सेवा पुरवण्याच्या पद्धतीत डिजिटल तंत्रज्ञानाने कायमचा बदल घडवून आणला आहे यावर  भर दिला.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी भारताने महामारीच्या कालावधीत आरोग्य सेतू ई संजीवनी आय गॉट डिजिटल मंच आणि को-विन यासारख्या विविध डिजिटल आरोग्य सेवांची माहिती दिली. अमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या डिजिटल आरोग्याच्या क्षमतेत बाबत सांगून ते म्हणाले की यामुळे केवळ आरोग्य सेवा प्रदान पद्धतीत सुधारणा होणार नाहीत तर प्राथमिक दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावर आरोग्य सेवा बिना खंड सुरू ठेवणे हे नागरिकांच्या इलेक्ट्रॉनिक आरोग्य रेकॉर्ड राखण्यातून साध्य करता येईल. डिजिटल आरोग्य सेवांचा हस्तक्षेप हा आरोग्य सेवेतील बदलाला वेग देण्यात  तसेच सार्वत्रिक आरोग्य सेवा देण्यात सहायक ठरेल. डिजिटल तंत्रज्ञानाचे आरोग्य क्षेत्रात परिणामकारक उपयोजन केल्याने कार्यक्षम सुरळीत चालणारी सार्वत्रिक आरोग्य सेवा स्थापित होऊन रुग्णांना लाभ मिळेल असे त्यांनी नमूद केले.

 

 

 

 

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908818) Visitor Counter : 179