आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडला शेअर बाजारात आयपीओद्वारे सूचीबद्ध करून त्यातील सरकारच्या भागभांडवलाची अंशतः विक्री करण्यासाठी तसेच आयआरईडीएद्वारे नवीन समभाग जारी करून निधी उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाने दिली परवानगी
Posted On:
17 MAR 2023 7:24PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींसंबंधी मंत्रिमंडळ समितीने (CCEA) आयपीओद्वारे शेअर बाजारात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा (MNRE) मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला (CPSE) शेअर बाजारात सूचीबद्ध करून त्यातील सरकारच्या भागभांडवलाची अंशतः विक्री करण्यासाठी तसेच नवीन इक़्विटी समभाग जारी करून निधी उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. ही सूची तयार करण्याची प्रक्रिया गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभाग (DIPAM) करेल.
आयआरईडीए ला प्रत्येकी 10.00 रुपयांचे चे 13.90 कोटी नवीन समभाग आयपीओद्वारे बुक बिल्डिंग आधारावर जनतेला जारी करण्याची परवानगी देण्यासाठी जून 2017 मध्ये घेतलेल्या सीसीईए च्या निर्णयाची जागा हा नवा निर्णय घेईल. मार्च, 2022 मध्ये सरकारने 1,500 कोटी रुपये भांडवल गुंतवल्यानंतर भांडवली संरचनेत बदल झाल्यामुळे त्वरित निर्णय घेणे गरजेचे होते.
इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) एकीकडे सरकारच्या गुंतवणुकीचे मूल्य जाहीर करण्यात मदत करेल आणि दुसरीकडे जनतेला राष्ट्रीय मालमत्तेमध्ये गुंतवणूकीची आणि त्यातून फायदे मिळवण्याची संधी देईल. याशिवाय सरकारी तिजोरीवर अवलंबून न राहता विस्तार योजनांची पूर्तता करण्यासाठी आयआरइडीए अर्थात भारतीय अपारंपरिक ऊर्जा विकास संस्थेला भांडवल उपलब्ध व्हायला मदत होईल तसेच भांडवली बाजारात नोंदणीसाठी द्याव्या लागणाऱ्या माहितीमुळे शिस्त आणि पारदर्शकता येऊन याद्वारे प्रशासन सुधारेल.
आयआरईडीए ही सध्या पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची मिनी- रत्न (प्रथम श्रेणी) सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. तिची स्थापना १९८७ मध्ये झाली. देशातील अपारंपरिक ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्पांना ही संस्था अर्थपुरवठा करते. ती भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) बिगर-बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) म्हणून नोंदणीकृत आहे.
हवामान बदल विषयक पॅरिस करारामध्ये नॅशनली डिटरमाइंड कॉँट्रिब्युशन (एनडीसी) चा भाग म्हणून दिलेल्या प्रतिज्ञानुसार केंद्र सरकारने 2022 पर्यंत 175 गिगावॅट आणि 2030 पर्यंत 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा स्थापित क्षमतेचे लक्ष्य ठेवले असून ते साध्य करण्यात त्यात आयआरईडीएची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आयआरईडीए द्वारे नूतनीकरण ऊर्जा/ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्पांची अंमलबजावणी आणि संचालन केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा उद्दिष्ट गाठण्यासाठी त्यांच्या व्यवसाय योजनेनुसार कुशल आणि अकुशल मनुष्यबळासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात मदत करेल.
***
Jaydevi/Shraddha/Prajna/Parshuram
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1908200)
Visitor Counter : 184
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam