आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी, 'एक आरोग्य: उत्तम आरोग्यासाठी एकात्मिक, सहयोगी आणि बहुक्षेत्रीय दृष्टीकोन' या संकल्पनेवरील सीआयआय भागीदारी परिषदेला केले मार्गदर्शन
भारत एक समग्र आणि एकात्मिक पर्यावरण आणि निसर्गाला अनुकूल धोरण निर्मितीच्या वातावरणासह "एक पृथ्वी, एक आरोग्य"; या दृष्टीने नेतृत्व करू शकतो, जागतिक आरोग्य आणि कल्याणासाठी, वसुधैव कुटुंबकम तत्त्वज्ञानाशी ते जोडू शकतो: केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय
Posted On:
15 MAR 2023 4:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2023
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी, आज नवी दिल्ली इथे, 'एक आरोग्य: उत्तम आरोग्यासाठी एकात्मिक, सहयोगी आणि बहुक्षेत्रीय दृष्टीकोन' या संकल्पनेवरील भारतीय उद्योग परिसंघ (सीआयआय) भागीदारी परिषद 2023 ला मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले, “एक पृथ्वी, एक आरोग्य” ही संकल्पना साकारण्यासाठी, भारताने सर्वसमावेशक आणि एकात्मिक पर्यावरण आणि निसर्गासाठी अनुकूल धोरण निर्मितीच्या वातावरणासह पुढाकार घेण्याची, आणि त्याला जागतिक आरोग्य आणि कल्याणासाठी वसुधैव कुटुंबकम या आपल्या तत्त्वज्ञानाशी जोडण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, सार्वत्रिक स्वीकारार्हतेसह व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य असलेले नवोन्मेशी संशोधन आणि तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेल्या उपायांचे नेतृत्व करण्याची मजबूत राजकीय इच्छाशक्ती आहे.”

जागतिक महामारीने हे दाखवून दिले आहे की, एखादा देश जगातील कोणत्याही देशामधील प्रतिकूल घडामोडींपासून मुक्त नाही, आणि आपल्या कृतींमुळे आपल्या परिसंस्थेचे आरोग्य आणि कल्याण प्रभावित होते. म्हणूनच, मानव जात म्हणून, केवळ स्वतःचे संरक्षण न करता, आपल्या कृतींमुळे, ज्या वातावरणाबरोबर आपले सह-अस्तित्व आहे, त्याचेही संरक्षण सुनिश्चित करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, यावर त्यांनी भर दिला.
आयुष्मान भारत योजनेसारख्या उपक्रमांच्या प्रगतीचे आणि आता सार्वजनिक डिजिटल माध्यम म्हणून प्रचलित असलेल्या को-विन व्यासपीठाच्या यशाची प्रशंसा करून, डॉ. मांडवीय म्हणाले की, आरोग्याकडे ‘सेवा’, म्हणजेच इतरांसाठी सेवा या दृष्टीकोनातून बघितले जाते.

पॅनेलच्या सदस्यांनी, जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणारी औषधे उपलब्ध करून देशातील आरोग्य सेवेला चालना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांची आणि उपक्रमांची प्रशंसा केली.
पॅनेलच्या सदस्यांनी ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या दृष्टीकोनाची प्रशंसा केली. कारण, तो रूढ प्रथा मोडणारा असून, ज्ञानाचे शहाणपण आणि उत्तरदायित्व याची सांगड घालतो. या ठिकाणी संशोधन-विकास आणि उत्पादन परिसंस्थेतील प्रत्येक भागधारक परिणामांची जबाबदारी स्वीकारतो.
सीआयआय आरोग्य सेवा परिषदेचे अध्यक्ष आणि ग्लोबल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश त्रेहान, सीआयआय चे व्यवस्थापकीय संचालक आणि जैवतंत्रज्ञानावरील राष्ट्रीय समिती पानासिया बॉयोटेक लिमिटेड चे डॉ. राजेश जैन, सीआयआय दक्षिण विभाग अध्यक्ष आणि भारत बॉयोटेकच्या सह संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुचित्रा इला या कार्यक्रमात पॅनेल सदस्य म्हणून उपस्थित होते.
* * *
S.Bedekar/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1907165)
Visitor Counter : 264