विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
डॉ जितेंद्र सिंह यांनी संशोधन अनुदान आणि निधीसाठी विशेष महिला पोर्टलची केली घोषणा; हे पोर्टल 1 एप्रिलपासून होणार कार्यान्वित
महिला शास्त्रज्ञांसाठी सीएसआयआर विशेष संशोधन अनुदान देणार: डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
09 MAR 2023 4:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2023
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान डॉ जितेंद्र सिंह यांनी आज संशोधन अनुदान आणि निधीसाठी विशेष महिला पोर्टलची घोषणा केली. हे पोर्टल १ एप्रिलपासून कार्यान्वित होईल.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ जितेंद्र सिंह बोलत होते. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने CSIR-ASPIRE उपक्रमा अंतर्गत महिला शास्त्रज्ञांसाठी विशेष संशोधन अनुदान सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भातील एक विशेष पोर्टल 1 एप्रिल 2023 रोजी सुरू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. त्याच दिवशी महिला शास्त्रज्ञांकडून प्रस्ताव आमंत्रित करणारे विशेष कॉल स्विकारले जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, डॉ जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या नियामक मंडळाच्या 17 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या 200 व्या बैठकीत एक्स्ट्राम्युरल रिसर्च स्कीम अंतर्गत महिला शास्त्रज्ञांकडून संशोधन अनुदान प्रस्ताव आमंत्रित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.
विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या मुख्य शाखा जसे की, जीवन विज्ञान, रसायन विज्ञान, भौतिक विज्ञान, अभियांत्रिकी विज्ञान आणि आंतर/ पार-विषय विज्ञान या प्रमुख शाखांमध्ये संशोधन अनुदानासाठी देशभरातील केवळ महिला शास्त्रज्ञ अर्ज करण्यास पात्र असतील.

कर्मचारी (JRF/SRF/RA), आकस्मिक स्थिती आणि किरकोळ उपकरणांसाठी हा निधी प्रदान केला जाईल.
हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिलांचे सक्षमीकरण आणि देशात ‘नारी शक्ती’ला चालना देण्याच्या उपक्रमाशी संरेखित आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा भारताच्या प्रगतीचा एक मध्यवर्ती आयाम असल्याचे पंतप्रधान मोदी मानतात आणि भारताला बळकट करण्यासाठी हे आवश्यक आहे, असे डॉ जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले.
* * *
JPS/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1905361)
Visitor Counter : 244
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Marathi
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam