अर्थ मंत्रालय

2019 मध्ये स्थापनेपासून स्वामिह निधीने 20,557 घरे केली पूर्ण


पुढील 3 वर्षात  1 आणि 2 श्रेणीतील 30 शहरांमध्ये 81,000 हून अधिक घरे पूर्ण करण्याचे निधीचे लक्ष्य.

निधीने 26 प्रकल्पांचे बांधकाम पूर्ण केले असून 35,000 कोटी रुपयांहून अधिक मुल्याची तरलता केली खुली

Posted On: 04 MAR 2023 3:08PM by PIB Mumbai

 

परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्नाच्या घरांसाठी विशेष खिडकी (SWAMIH) गुंतवणूक निधीI हा भारतातील सर्वात मोठा सामाजिक प्रभाव असणारा निधी आहे. हा निधी विशेषत्वाने तणावग्रस्त आणि रखडलेले निवासी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गठीत करण्यात आला आहे.

हा निधी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने प्रायोजित केला असून स्टेट बँक ग्रुप कंपनी SBICAP व्हेंचर्स लिमिटेड द्वारे याचे कामकाज नियंत्रित केल जाते. भारतात किंवा जागतिक बाजारपेठेत या फंडाचा कोणताही पूर्व किंवा तुलनात्मक समवयस्क निधी नाही.

परवडणारे, मध्यम-उत्पन्न गृहनिर्माण श्रेणीतील लोकांना घरे पूरवण्याकरिता, तणावग्रस्त, ब्राउनफील्ड (रिकामे भूखंड) आणि रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी ( रेरा ) नोंदणीकृत निवासी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य कर्ज वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने आतापर्यंत 15,530 कोटी निधी संकलित करण्यात आला आहे.

SWAMIH ने आतापर्यंत सुमारे 130 प्रकल्पांना 12,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या निधीसह अंतिम मंजुरी दिली आहे. 2019 मध्ये स्थापनेपासून तीन वर्षांत, निधीने 20,557 घरे पूर्ण केली आहेत आणि पुढील तीन वर्षांत टियर 1 आणि 2 श्रेणीतील 30 शहरांमध्ये 81,000 घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

निधी प्रथमच विकासक, अडचणीत आलेले प्रकल्प चालवणारे प्रस्थापित विकासक, रखडलेल्या प्रकल्पांचे खराब ट्रॅक रेकॉर्ड असलेले विकासक, ग्राहकांच्या तक्रारी आणि एनपीए खाती, शिवाय खटल्याच्या समस्या असलेल्या प्रकल्पांचाही विचार करत असल्याने संकटग्रस्त प्रकल्पांसाठी हा अंतिम उपाय मानला जातो आहे.

प्रकल्पाच्या खर्चावर मजबूत पर्यवेक्षण आणि नियंत्रण हा SWAMIH च्या गुंतवणूक प्रक्रियेचा मुख्य आधार आहे. यामुळे प्रकल्प जलद गतीने पूर्ण करणे शक्य होते. एखाद्या प्रकल्पातील निधीची उपस्थिती अनेकदा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांमध्येही चांगल्या संकलनासाठी आणि विक्रीसाठी उत्प्रेरक म्हणून काम करते.

मजबूत नियंत्रण आणि प्रकल्प तसेच प्रवर्तकांचा  ट्रॅक रेकॉर्ड असूनही, निधी योजनेने 26 प्रकल्पांचे बांधकाम पूर्ण करण्यात आणि गुंतवणूकदारांना परतावा देण्यास यश मिळवले आहे.

या योजनेने रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील अनेक सहायक उद्योगांच्या वाढीमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून 35,000 कोटी रुपयांहून अधिक मुल्याची तरलता केली अनलॉक केली आहे.

***

G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1904166) Visitor Counter : 197