ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
सध्या सुरू असलेल्या धान खरेदीमुळे 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना झाला फायदा
हमीभावापोटी 146960 कोटी रुपये देऊन एकूण 713 लाख मेट्रिक टन धान खरेदी करण्यात आली
Posted On:
03 MAR 2023 10:31AM by PIB Mumbai
खरीप विपणन हंगाम (केएमएस) 2022-23 साठी सुरू असलेल्या धान खरेदीमुळे 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. 01.03.2023 पर्यंत सुमारे 713 लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक धानाची खरेदी करण्यात आली आणि किमान हमीभाव म्हणून 146960 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले.
कुठल्याही अडचणी-विना खरेदी प्रक्रिया पार पडावी यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या धानाचे वितरण सुरु असून 713 लाख मेट्रीक टन धान खरेदीच्या तुलनेत केंद्रीय साठ्यात सुमारे 246 लाख मेट्रीक टन तांदूळ साठा प्राप्त झाला आहे. देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्रीय साठ्यात सध्या पुरेसा तांदूळ साठा उपलब्ध आहे.
चालू खरीप विपणन हंगाम 2022-23 च्या खरीप पिकासाठी, सुमारे 766 लाख मेट्रिक टन धान (तांदूळाच्या बाबतीत 514 लाख मेट्रीक टन) खरेदी केले जाण्याचा अंदाज आहे. चालू खरीप विपणन हंगाम 2022-23 च्या रब्बी पिकासाठी, सुमारे 158 लाख मेट्रीक टन धान (तांदळाच्या बाबतीत106 लाख मेट्रीक टन) खरेदीचा अंदाज आहे. रब्बी पिकाच्या समावेशासह, संपूर्ण खरीप विपणन हंगाम 2022-23 मध्ये सुमारे 900 लाख मेट्रीक टन धानाची खरेदी होण्याची शक्यता आहे.
***
Umesh Ujgare//Sushama Kane/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1903817)
Visitor Counter : 281