अर्थ मंत्रालय

फेब्रुवारी 2023 मध्ये एकूण जीएसटी पोटी ₹1,49,577 कोटी महसूल झाला जमा ; गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा यंदा 12% जास्त


सलग 12 महिने 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मासिक जीएसटी महसूल जमा

गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वस्तूंच्या आयाती द्वारे जमा झालेला महसूल 6% जास्‍त, तर देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) 15% जास्त

Posted On: 01 MAR 2023 4:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मार्च 2023

फेब्रुवारी 2023 मध्ये जीएसटी (GST) पोटी जमा झालेला  एकत्रित महसूल ₹1,49,577 कोटी इतका आहे. त्यापैकी सीजीएसटी (CGST) ₹27,662 कोटी, एसजीएसटी (SGST) ₹34,915 कोटी, आयजीएसटी (IGST) ₹75,069 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा झालेल्या  ₹35,689 कोटींसह) आणि उपकर ₹11,931 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा झालेल्या ₹792 कोटींसह) आहे.

सरकारने आयजीएसटी मधून नियमित थकबाकीपोटी  ₹34,770 कोटी सीजीएसटी आणि  ₹29,054 कोटी एसजीएसटी ची थकबाकी दिली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये नियमित थकबाकी नंतर  केंद्र आणि राज्यांकडून जमा झालेला एकूण महसूल, CGST साठी ₹62,432 कोटी आणि SGST साठी ₹63,969 कोटी इतका आहे. याव्यतिरिक्त, केंद्राने शिल्लक GST भरपाई पोटी, जून 2022 या  महिन्यासाठी ₹16,982 कोटी, तर आधीच्या कालावधीसाठीची  AG प्रमाणित आकडेवारी  पाठवणारी राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांना ₹16,524 कोटी रक्कम जारी केली होती.

फेब्रुवारी 2023 मध्ये जीएसटी पोटी गोळा झालेला महसूल, मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 12% जास्त आहे, जो  रु. 1,33,026 कोटी इतका होता. या महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वस्तूंच्या आयाती द्वारे जमा झालेला महसूल 6% जास्त आहे आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) 15% जास्त आहे.

जीएसटी लागू झाल्यापासून या महिन्यात उपकारा पोटी ₹11,931 कोटी इतका आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल जमा झाला. साधारणपणे, फेब्रुवारी हा 28 दिवसांचा महिना असल्याने, तुलनेने कमी महसूल जमा होतो.

खालील तक्ता  चालू वर्षातील एकूण मासिक जीएसटी महसुलाची आकडेवारी दर्शवितो. फेब्रुवारी 2022 च्या तुलनेत फेब्रुवारी 2023 मधील जीएसटीची राज्यवार आकडेवारी पुढील तक्ता दर्शवितो.

फेब्रुवारी 2023 ची  जीएसटी महसुलामधील  राज्यवार वाढ[1]

State

Feb-22

Feb-23

Growth

Jammu and Kashmir

326

434

33%

Himachal Pradesh

657

691

5%

Punjab

1,480

1,651

12%

Chandigarh

178

188

5%

Uttarakhand

1,176

1,405

20%

Haryana

5,928

7,310

23%

Delhi

3,922

4,769

22%

Rajasthan

3,469

3,941

14%

Uttar Pradesh

6,519

7,431

14%

Bihar

1,206

1,499

24%

Sikkim

222

265

19%

Arunachal Pradesh

56

78

39%

Nagaland

33

54

64%

Manipur

39

64

64%

Mizoram

24

58

138%

Tripura

66

79

20%

Meghalaya

201

189

-6%

Assam

1,008

1,111

10%

West Bengal

4,414

4,955

12%

Jharkhand

2,536

2,962

17%

Odisha

4,101

4,519

10%

Chhattisgarh

2,783

3,009

8%

Madhya Pradesh

2,853

3,235

13%

Gujarat

8,873

9,574

8%

Dadra and Nagar Haveli

260

283

9%

Maharashtra

19,423

22,349

15%

Karnataka

9,176

10,809

18%

Goa

364

493

35%

Lakshadweep

1

3

274%

Kerala

2,074

2,326

12%

Tamil Nadu

7,393

8,774

19%

Puducherry

178

188

5%

Andaman and Nicobar Islands

22

31

40%

Telangana

4,113

4,424

8%

Andhra Pradesh

3,157

3,557

13%

Ladakh

16

24

56%

Other Territory

136

211

55%

Centre Jurisdiction

167

154

-8%

Total

98,550

1,13,096

15%

****

 

 

[1]मालाच्या आयातीवरील जीएसटी समाविष्ट नाही

 

 

 

 

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1903395) Visitor Counter : 259