पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशातील सिधी येथे बस अपघातात झालेल्य जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50,000 रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची घोषणा
प्रविष्टि तिथि:
25 FEB 2023 3:00PM by PIB Mumbai
मध्य प्रदेशातील सिधी येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
“मध्य प्रदेशातील सिधी येथे झालेला बस अपघात वेदनादायक आहे. या दु:खाच्या प्रसंगी ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या दु:खात मी सामील आहे. जखमी लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे. मध्यप्रदेश सरकार सर्व बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे.”
“मध्यप्रदेशातील अपघातातील प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रूपये दिले जातील”
***
S.Kane/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1902324)
आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam