पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

देशाची समृद्धी ही कनेक्टिव्हिटीमध्ये आहे आणि ती आमच्या प्राधान्यक्रमात सर्वोच्च आहे: पंतप्रधान

Posted On: 25 FEB 2023 9:46AM by PIB Mumbai

 

उत्तर प्रदेशातील खजानी विधानसभा मतदारसंघातील बेलघाट ते सिक्रीगंज या 8 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी परिसरातील जनतेचे अभिनंदन केले आहे. संत कबीर नगरचे खासदार प्रवीण निषाद यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान बोलत होते. या रस्त्याच्या रुंदीकरणाची माहिती निषाद यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली होती.

देशाची समृद्धी ही कनेक्टिव्हिटीमध्ये आहे आणि ती आमच्या प्राधान्यक्रमात सगळ्यात वरच्या स्थानी आहे, असेही मोदी म्हणाले.

 

पंतप्रधानांनी केलेले ट्विट

खूप खूप अभिनंदनकनेक्टिविटी मध्येच देशाची भरभराट आहे आणि तीच आमच्या प्राधान्यक्रमात अव्वलस्थानी आहे.

***

M.Jaybhaye/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1902229) Visitor Counter : 133