नागरी उड्डाण मंत्रालय

केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक (शिकागो करार ), 1944 करारातील सुधारणांशी संबंधित कलम 3 बीआयएस आणि अनुच्छेद 50 (अ) आणि अनुच्छेद 56 संबंधी तीन प्रोटोकॉलना मान्यता दिली

Posted On: 22 FEB 2023 2:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22  फेब्रुवारी  2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक (शिकागो करार ), 1944 मधील सुधारणांशी संबंधित कलम 3 बीआयएस आणि अनुच्छेद 50 (अ) आणि अनुच्छेद 56 वरील तीन प्रोटोकॉलना मान्यता दिली.

शिकागो कराराच्या कलमांमध्ये   करार करणाऱ्या  राज्यांचे विशेषाधिकार आणि दायित्वे नमूद केली आहेत आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचे नियमन करणार्‍या आंतरराष्ट्रीय आयसीएओ  मानके तसेच  शिफारस केलेल्या पद्धतीचा  अवलंब करण्यास प्रोत्साहन देतात.

गेल्या 78 वर्षांमध्ये शिकागो करारात  काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत आणि भारताने वेळोवेळी अशा दुरुस्त्यांना मान्यता दिली  आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक "शिकागो करार ", 1944 मधील दुरुस्त्यांशी संबंधित खालील तीन प्रोटोकॉलना  मान्यता देण्यात आली आहे:

  1. शिकागो करार , 1944 मध्ये कलम 3 बीआयएस  नियम  सदस्य देशांना विमान प्रवासात नागरी विमानांविरुद्ध शस्त्रे वापरण्यापासून परावृत्त करण्यासाठी  समाविष्ट केला आहे. यावर 1984 मध्ये स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.
  2. आयसीएओ कौन्सिलची संख्या 36 वरून 40 पर्यंत वाढवण्यासाठी शिकागो करार , 1944 च्या कलम 50 (a) मध्ये सुधारणा करण्यासाठी प्रोटोकॉल (ऑक्टोबर, 2016 मध्ये प्रोटोकॉलवर स्वाक्षरी );

आणि

  1. एअर नेव्हिगेशन कमिशनचे संख्याबळ 18 ते 21 पर्यंत वाढवण्यासाठी शिकागो करार  1944 च्या अनुच्छेद 56 मध्ये सुधारणा करण्यासाठी प्रोटोकॉल   (ऑक्टोबर, 2016 मध्ये प्रोटोकॉलवर स्वाक्षरी).

या मंजुरीमुळे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतुकीवरील करारात अंतर्भूत असलेल्या तत्त्वांप्रति भारताची वचनबद्धता अधिक दृढ होईल. या मंजुरीमुळे भारताला आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतुकीशी संबंधित बाबींमध्ये अधिक महत्त्वाची भूमिका बजावण्याची उत्तम संधी मिळेल.

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 



(Release ID: 1901335) Visitor Counter : 147