पंतप्रधान कार्यालय

भारत आणि सिंगापूर दरम्यान यूपीआय-पे नाऊ लिंकेजच्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे झालेल्या उदघाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग दोघेही झाले सहभागी


यूपीआय-पे नाऊ लिंकेज देशांच्या सीमारेषा ओलांडत पैसे पाठविण्याची सेवा करणार किफायतशीर आणि उचित वेळेत

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर,आणि सिंगापूर नाणे प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी भारत आणि सिंगापूर दरम्यान केला पहिला सीमापार व्यवहार

Posted On: 21 FEB 2023 12:48PM by PIB Mumbai

फेब्रुवारी 21,2023


पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान श्री ली सिएन लूंग दोघेही भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि सिंगापूरच्या पे नाऊ (PayNow)यांच्यातील रिअल टाइम पेमेंट लिंकेजच्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे झालेल्या उदघाटन समारंभात आज सहभागी झाले.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर श्री शक्तिकांत दास आणि सिंगापूरच्या नाणे प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवी मेनन यांनी आपापल्या मोबाईल फोनचा वापर करून एकमेकांशी थेट सीमा ओलांडून व्यवहार केले.

क्रॉस बॉर्डर पर्सन टू पर्सन (P2P) पेमेंट सुविधा सुरू करण्यात आलेला सिंगापूर हा पहिला देश आहे.यामुळे सिंगापूरमधील भारतीय वंशाचे नागरीक, विशेषत: स्थलांतरित कामगार/विद्यार्थ्यांना मदत होईल आणि सिंगापूरमधून भारतात तात्काळ आणि कमी खर्चात रक्कम हस्तांतरित करून डिजिटलायझेशन आणि फिनटेकचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील.सिंगापूरमधील निवडक व्यापारी दुकानांमध्ये व्यावसायिक आस्थापनांमध्ये क्यू आर (QR) कोडद्वारे यूपीआय(UPI) रक्कम स्वीकारणे ही सुविधा यापूर्वीपासूनच उपलब्ध आहे.

दृकश्राव्य माध्यमाद्वारे हे उद्घाटन करण्यापूर्वी दोन्ही पंतप्रधानांनी आपापसात फोन वरून संभाषण केले आणि परस्पर हिताच्या क्षेत्रांवर चर्चा केली.भारत-सिंगापूर द्विपक्षीय संबंध पुढे नेण्याच्या भागीदारीबद्दल पंतप्रधानांनी  सिंगापूरचे पंतप्रधान ली यांचे आभार मानले आणि भारताच्या जी-20 (G20) अध्यक्षतेखाली त्यांच्यासह काम पुढे नेण्याबाबत उत्सुकता दर्शविली आहे.

***

GopalC/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1901014) Visitor Counter : 225