युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
विविध खेळाडूंना परदेशी प्रशिक्षण आणि स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी, मिशन ऑलिंपिक विभागाकडून आर्थिक मदत मंजूर
प्रविष्टि तिथि:
19 FEB 2023 5:00PM by PIB Mumbai
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीतील मिशन ऑलिंपिक सेल (MOC) ने 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी 10 जुडोका, 2 बॅडमिंटन खेळाडू आणि 3 तलवारबाजी खेळाडूंना प्रशिक्षण तसेच स्पर्धे (ग्रँड स्लॅम) साठी आर्थिक सहाय्य मंजूर केले.
10 जुडोका, ज्यात 3 टॉप्स अंतर्गत विकसित खेळाडू आणि 7 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रातील खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू 21 दिवस उझबेकिस्तान आणि जॉर्जियामध्ये प्रशिक्षण घेतील, तसंच या कालावधीत उझबेकिस्तान, जॉर्जिया आणि तुर्कीये इथे होणाऱ्या 3 ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये देखील ते भाग घेतील.
खेळाडूंचे स्पर्धा सहभाग शुल्क, विमान भाडे, निवास/बोर्डिंग, वैद्यकीय विमा, स्थानिक प्रवास आणि इतर खर्चांसह भोजनाचा खर्च भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) करणार आहे.
मिशन ऑलिंपिक सेलने जर्मन खुली बॅडमिंटन स्पर्धा, ऑल इंग्लंड अजिंक्यपद, स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा, ऑर्लीयन्स मास्टर्स आणि स्पेन मास्टर्स या आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठीच्या दोन बॅडमिंटनपटूंच्या खर्चालाही मंजूरी दिली आहे.
तलवारबाजीमध्ये, तलवारबाज लैश्राम मोरांबा, श्रेया गुप्ता आणि ओयनम जुबराज सिंग यांना मार्चमध्ये ताश्कंद इथे होणाऱ्या कॅडेट आणि ज्युनियर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे, तर जलतरणपटू श्रीहरी नटराज ला सिंगापूर आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील सहभागासाठी त्यांचे वैयक्तिक प्रशिक्षक निहार आमीन आणि फिजिओथेरपिस्ट कार्तिकेयन बालवेंकटेशन यांच्या सेवांसह आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
दोन दिवसीय बैठकीदरम्यान, भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि विविध राष्ट्रीय महासंघांच्या प्रतिनिधींसह मिशन ऑलिंपिक सेलच्या सदस्यांनी आगामी आशियाई क्रीडास्पर्धा आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या आराखड्यावर चर्चा केली.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1900551)
आगंतुक पटल : 243