पंतप्रधान कार्यालय

भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांचे मानले आभार

Posted On: 26 JAN 2023 10:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जानेवारी 2023

 

भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"धन्यवाद पंतप्रधान @AlboMP. ऑस्ट्रेलिया दिनानिमित्त आपल्याला आणि ऑस्ट्रेलियाच्या मैत्रीपूर्ण लोकांना शुभेच्छा."

नेपाळच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"@cmprachanda जी आपल्या स्नेहमय शुभेच्छांबद्दल धन्यवाद!"

भूतानच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"@PMBhutan डॉ. लोटे शेरिंग आपल्या स्नेहमय शुभेच्छांबद्दल धन्यवाद! दोन्ही देशांची प्रगती आणि समृद्धीसाठी भूतानबरोबरच्या आगळ्या वेगळ्या भागीदारीसाठी भारत वचनबद्ध आहे.

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"राष्ट्राध्यक्ष @ibusolih, आपल्या स्नेहमय शुभेच्छांबद्दल धन्यवाद. समान लोकशाही मूल्यांच्या आधारे भारत-मालदीव भागीदारीने साधलेली शाश्वत प्रगती पाहून आनंद वाटत आहे."

इस्रायलच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण दिलेल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद, पंतप्रधान @netanyahu.आपली धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल अशी आशा आहे."

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रिय मित्र @EmmanuelMacron, आपण दिलेल्या स्नेहमय शुभेच्छांबद्दल कृतज्ञ आहे.

भारताच्या जी20 अध्यक्षपदाच्या यशासाठी आणि भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या 25 व्या वर्षानिमित्त एकत्र काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा मी पुरस्कार करतो. भारत आणि फ्रान्स जागतिक कल्याणाची ताकद आहेत.

मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"धन्यवाद, पीएम @KumarJugnauth. आधुनिक प्रजासत्ताक म्हणून आपल्या सामायिक वाटचालीत, दोन्ही देश लोककेंद्रित विकासाचे जवळचे भागीदार आहेत. मॉरिशसबरोबरची आपली दीर्घकालीन भागीदारी नवी उंची गाठेल अशी आशा आहे.

 

 

 

 

R.Aghor/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894025) Visitor Counter : 167