महिला आणि बालविकास मंत्रालय
भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते २३ जानेवारीला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 प्रदान करण्यात येणार
11 बालकांना सहा श्रेणींमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार
24 जानेवारी रोजी पंतप्रधान या पुरस्कार विजेत्यांशी साधणार संवाद
महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती झुबिन इराणी, राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई यांच्या उपस्थितीत या मुलांशी साधणार संवाद आणि त्यांचे अभिनंदन करणार
पुरस्कार विजेत्यांमध्ये 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 6 मुले आणि 5 मुलींचा समावेश
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळविणाऱ्या प्रत्येक पुरस्कारार्थीला पदक, रोख 1 लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाईल.
Posted On:
22 JAN 2023 10:48AM by PIB Mumbai
भारताच्या राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू उद्या दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी विज्ञान भवन येथे होणाऱ्या एका समारंभात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या 11 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, 2023 प्रदान करणार आहेत.
पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी 24 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान या राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील.
महिला व बालविकास मंत्री, श्रीमती. स्मृती झुबिन इराणी 24 जानेवारी 2023 रोजी राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई यांच्या सन्माननीय उपस्थितीत या मुलांशी संवाद साधतील आणि त्यांनी केलेल्या श्रेणींविषयी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करतील.
कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, शैक्षणिक, समाजसेवा आणि क्रीडा अशा क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांना मान्यता मिळणे आवश्यक आहे, अशा बालकांना भारत सरकारतर्फे त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) पुरस्कार प्रदान करण्यात येतात. 5 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना, सहा विविध श्रेणींमध्ये त्यांच्या उत्कृष्ट
कामगिरीबद्दल हे पुरस्कार प्रदान केले जातात. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) मिळविणाऱ्या प्रत्येक पुरस्कारार्थीला पदक, 1 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र प्रदान केले जातात.
यावर्षी देशातील सर्व विभागातून निवडलेल्या 11 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून कला आणि संस्कृती क्षेत्रात (4), शौर्य (1), नवोन्मेष (2), समाजसेवा (2) अशा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
*********
Hansraj R/Sampada P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1892782)
Visitor Counter : 325