आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताचे जी 20 परिषदेचे अध्यक्षपद


जी 20 आरोग्य कार्य गटाची पहिली बैठक 18 ते 20 जानेवारी या कालावधीत  केरळ मध्ये तिरुवनंतपुरम येथे होणार

Posted On: 16 JAN 2023 2:16PM by PIB Mumbai

 

भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेखाली आरोग्य कार्य गटाची पहिली बैठक 18 ते 20 जानेवारी या कालावधीत केरळ मध्ये तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. भारताने 1 डिसेंबर 2022 रोजी जी 20 अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. भारत सध्या जी 20 च्या ट्रोइकाचा एक भाग आहे ज्यामध्ये इंडोनेशिया, भारत आणि ब्राझील यांचा समावेश आहे, प्रथमच ट्रोइकामध्ये तीन विकसनशील आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे.

भारताचे जी 20 परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, कृती-केंद्रित आणि निर्णायक असेल, याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पंतप्रधानांनी मांडलेली एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य संकल्पना, भारताच्या वसुधैव कुटुंबकम् या तत्त्वप्रणालीशी सुसंगत आहे. महामारी पश्चात एका निरोगी जगाची उभारणी करण्यासाठी संपूर्ण विश्वाने एकत्र येऊन कार्य करण्याचे जगाला केलेले हे आवाहन आहे.

भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेखाली आरोग्य क्षेत्राअंतर्गत आरोग्य कार्यकारी गटाच्या चार बैठका आणि एक आरोग्य मंत्रिस्तरीय बैठक यांचा समावेश आहे. भारताच्या समृद्ध आणि वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडवण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनानुसार या बैठका देशभरात विविध ठिकाणी घेतल्या जातील, यामध्ये तिरुअनंतपुरम (केरळ), गोवा, हैदराबाद (तेलंगणा) आणि गांधीनगर (गुजरात), यांचा समावेश आहे.

जी 20 चर्चासत्रे अधिक ज्ञानवर्धक, पूरक व्हावीत या उद्देशाने पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या जोडीला विविध उपक्रम आयोजित करण्याची भारताची योजना आहेयामध्ये वैद्यकीय मूल्य असलेला प्रवास आणि डिजिटल आरोग्य, अंमली पदार्थांवर एकत्रित संशोधनासाठी कार्यशाळा, निदान आणि लसी, तसेच पारंपरिक औषधांसाठीच्या जागतिक केंद्रासाठी एकत्रित ब्रॅंडिंग हे सर्व कार्यक्रम तिरुवनंतपुरम येथे होणाऱ्या जी 20 आरोग्य कार्यकारी गटाच्या 18 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान होणाऱ्या पहिल्या बैठकीच्या अनुषंगाने होणार आहेत.

आपल्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आरोग्य क्षेत्रातील प्राधान्यक्रम सुरु ठेवण्याचे आणि त्यांचा एकत्रित मेळ घालण्याचे आणि मागील अध्यक्षपदाच्या काळातील महत्त्वाच्या आणि  बळकटीकरणाची आवश्यकता असलेल्या संवेदनशील क्षेत्रांवर कार्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. याशिवाय आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या बहुपक्षीय व्यासपीठांवर होणाऱ्या चर्चेत एकवाक्यता आणून एकात्मिक कृतीच्या दिशेने कार्य करणे हे भारताचे उद्दिष्ट आहे.

यासाठी, भारताने जी 20 आरोग्य विभागासाठी खालील तीन प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत:

प्राधान्यक्रम I: आरोग्य आपत्कालीन प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसाद (एक आरोग्य आणि प्रतिजैविक प्रतिकार antimicrobial resistance वर लक्ष केंद्रित करणे)

प्राधान्यक्रम II: औषधनिर्माण क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर देणे, यामध्ये सुरक्षित, परिणामकारक, दर्जेदार आणि किफायतशीर वैद्यकीय प्रतिबंधात्मक उपाय (लस, उपचार आणि निदान) यांचा समावेश आहे.

प्राधान्यक्रम III: डिजिटल आरोग्य नवकल्पना आणि सार्वत्रिक स्तरावर आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी उपाययोजना तसेच आरोग्य विषयक सेवांमध्ये सुधारणा.

जी 20 आरोग्य कार्यकारी गटाच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर या प्राधान्यक्रमांशी निगडित संकल्पनांवर आधारित चर्चा केली जाईल. या बैठकीला जी 20 सदस्य देश, विशेष आमंत्रित देश आणि संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

***

N.Chitale/B.Sontakke/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1891590) Visitor Counter : 373