अर्थ मंत्रालय

डिसेंबर - 2022 मध्ये वस्तू आणि सेवा करातून 1,49,507 कोटी रुपयांचा महसूल जमा. गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात 15% ची वाढ


सलग दहा महीने वस्तू आणि सेवा करातून मिळणारा मासिक महसूल 1.4 लाख कोटी रुपयांहून जास्त

Posted On: 01 JAN 2023 5:41PM by PIB Mumbai

 

डिसेंबर 2022 मध्ये देशाचे सकल वस्तू आणि सेवा कर संकलन 1,49,507 कोटी रुपये झाले असून त्यामध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर संकलन   26,711  कोटी रुपयेराज्य वस्तू आणि सेवा कर 33,357 कोटी रुपयेवस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या 40,263 कोटी रुपयांचा समावेश असलेला एकात्मिक वस्तू आणि सेवा कर 78,434 कोटी रुपये  आणि वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या रु. 850 कोटींसह 11,005 कोटी रुपये अधिभारातून मिळालेला महसूल यांचा समावेश आहे.

सरकारने नियमित तडजोडीचा भाग म्हणून अधिभारातून केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 36,669 कोटी रुपये आणि राज्य वस्तू आणि सेवा करापोटी 31,094 कोटी रुपयांची तडजोड केली आहे. डिसेंबर 2022 साठी नियमित तडजोडीनंतर केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल केंद्रीय वस्तू आणि सेवा करासाठी 63,380 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 64,451 कोटी रुपये इतका आहे.

डिसेंबर 2022 मधील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 15% नी जास्त आहे. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 8% नी जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत 18% नी जास्त आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये 7.9 कोटी -वे बिल तयार झाली, ऑक्टोबर 2022 मध्ये तयार झालेल्या 7.6 कोटी -वे बिलांहून ही संख्या लक्षणीयरित्या जास्त आहे.

खालील तक्त्यामध्ये चालू वर्षातील मासिक सकल वस्तू आणि सेवा करातून मिळणाऱ्या महसुलाचा कल दर्शविला आहे. डिसेंबर 2021 च्या तुलनेत डिसेंबर 2022 मध्ये प्रत्येक राज्यात जमा झालेल्या वस्तू आणि सेवा कराची राज्यनिहाय आकडेवारी सारणीमध्ये दिसत आहे.

 

State-wise growth of GST Revenues (Rs crore) during December 2022[1]

 

State

Dec-21

Dec-22

Growth

1

Jammu and Kashmir

320

410

28%

2

Himachal Pradesh

662

708

7%

3

Punjab

1,573

1,734

10%

4

Chandigarh

164

218

33%

5

Uttarakhand

1,077

1,253

16%

6

Haryana

5,873

6,678

14%

7

Delhi

3,754

4,401

17%

8

Rajasthan

3,058

3,789

24%

9

Uttar Pradesh

6,029

7,178

19%

10

Bihar

963

1,309

36%

11

Sikkim

249

290

17%

12

Arunachal Pradesh

53

67

27%

13

Nagaland

34

44

30%

14

Manipur

48

46

-5%

15

Mizoram

20

23

16%

16

Tripura

68

78

15%

17

Meghalaya

149

171

15%

18

Assam

1,015

1,150

13%

19

West Bengal

3,707

4,583

24%

20

Jharkhand

2,206

2,536

15%

21

Odisha

4,080

3,854

-6%

22

Chhattisgarh

2,582

2,585

0%

23

Madhya Pradesh

2,533

3,079

22%

24

Gujarat

7,336

9,238

26%

25

Daman and Diu

2

-

-86%

26

Dadra and Nagar Haveli

232

317

37%

27

Maharashtra

19,592

23,598

20%

29

Karnataka

8,335

10,061

21%

30

Goa

592

460

-22%

31

Lakshadweep

1

1

-36%

32

Kerala

1,895

2,185

15%

33

Tamil Nadu

6,635

8,324

25%

34

Puducherry

147

192

30%

35

Andaman and Nicobar Islands

26

21

-19%

36

Telangana

3,760

4,178

11%

37

Andhra Pradesh

2,532

3,182

26%

38

Ladakh

15

26

68%

97

Other Territory

140

249

78%

99

Center Jurisdiction

186

179

-4%

 

Grand Total

91,639

1,08,394

18%

 

***

S.Patil/V.Sahajrao/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1887887) Visitor Counter : 289