पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा
प्रविष्टि तिथि:
26 DEC 2022 9:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
भारताकडे यावर्षी जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आल्याबद्दल युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी शुभेच्छा दिल्या. अन्न तसेच उर्जा सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांसह, विकसनशील देशांच्या विविध समस्या जगासमोर मांडण्यासोबत भारताने जी-20 समूहाच्या अध्यक्षपदावरून अधिक प्राधान्य दिलेल्या विषयांबाबत पंतप्रधान मोदी यांनी झेलेन्स्की यांना माहिती दिली.
दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यासाठीच्या संधींवर दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. यावर्षीच्या सुरुवातीला युद्धसदृश परिस्थितीमुळे मायदेशी परत यावे लागलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे युक्रेनमधील शिक्षण यापुढेही सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या अधिकाऱ्यांना केली.
युक्रेनमध्ये अजूनही सुरु असलेल्या संघर्षाबाबत दोन्ही नेत्यांनी विचारांचे आदानप्रदान केले. तेथील संघर्ष तात्काळ संपुष्टात येण्यासाठी मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला आणि ते म्हणाले की, या संघर्षातील दोन्ही बाजूंनी त्यांच्या मतभेदांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी चर्चा आणि राजनैतिक संबंधांचा मार्ग अनुसरावा. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरु असलेल्या कोणत्याही प्रयत्नांना भारताचा नेहमीच पाठींबा असेल असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी, या संघर्षामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना मानवतावादी दृष्टीकोनातून पाठबळ पुरविण्याप्रती भारत नेहमीच कटिबद्ध असेल अशी ग्वाही दिली.
* * *
R.Aghor/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1886777)
आगंतुक पटल : 305
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam