पंतप्रधान कार्यालय
अंधांचा टी - 20 क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
17 DEC 2022 7:57PM by PIB Mumbai
अंधांचा टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
भारतीय संघाचे अभिनंदन करताना पंतप्रधानांनी भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेचे (डिफरंटली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडिया) ट्विट, आपल्या ट्विटर खात्यावरून शेअर केले आहे.
पंतप्रधानांचा ट्विटर संदेश;
“आपल्या या खेळाडूंचा संपूर्ण भारताला अभिमान आहे. आपण अंधांचा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्याचा मला प्रचंड आनंद झाला आहे. या विजयाबद्दल आपल्या संघाचे अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा.”
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1884480)
आगंतुक पटल : 264
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam