अर्थ मंत्रालय
भारताच्या जी 20 अध्यक्षतेअंतर्गत अर्थ आणि मध्यवर्ती बँकांच्या प्रतिनिधींची पहिली बैठक उद्या बंगळूरू मध्ये आयोजित
जी-20 ची अर्थ पाठपुरावा समिती (Finance Track agenda) जागतिक आर्थिक संभाषण आणि धोरण समन्वयाच्या माध्यमातून याची प्रक्रिया राबवते आणि याला एक प्रभावी मंच प्रदान करते.
सुमारे ४० बैठकांच्या मालिकेतून भारत ग्लोबल साउथ ची आपली भूमिका तसंच एकतेला प्रोत्साहन या भूमिका ठामपणे मांडेल आणि एकात्मिक कृतीचा आपला विषय पुढे नेईल.
भारत हा ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेनुसार जागतिक प्राधान्यक्रम पुढे नेण्यासाठी एक समान भूमिका राबवेल.
Posted On:
11 DEC 2022 12:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2022
जी 20 आर्थिक आणि मध्यवर्ती बँकांच्या प्रतिनिधींची पहिली बैठक बंगरूळूमध्ये 13 ते 15 डिसेंबर 2022 दरम्यान आयोजित केली आहे. या बैठकीच्या माध्यमातून भारताच्या जी 20 अध्यक्षते अंतर्गत अर्थ पाठपुरावा विषय पत्रिकेच्या चर्चांना सुरुवात होणार आहे. अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व बँक यांनी संयुक्तरीत्या या बैठकीचं आयोजन केलं आहे.
जी-20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेली जी 20 फायनान्स ट्रॅक आर्थिक आणि अर्थ पुरवठ्याबाबतच्या विषयांवर लक्ष केंद्रित करते. हा प्रभावी मंच जागतिक आर्थिक धोरण संवाद. आणि समन्वयाला एक प्रभावी मंच प्रदान करतो. अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकांच्या गव्हर्नरची पहिली बैठक 23 ते 25 फेब्रुवारी 2023 दरम्यान बंगरूळूमध्ये होणार आहे.
माननीय प्रधानमंत्री बाली इथं जी 20 परिषदेला संबोधित करताना म्हणाले होते की विकासाचे लाभ जागतिक आणि सर्वसमावेशक असावेत ही आजची गरज आहे. अर्थ मंत्रालयाने या जी 20 आर्थिक पाठपुरावा विषय पत्रिकेत या संकल्पनेचा समावेश केला होता. पुढील एक वर्षात नवनवीन संकल्पना मांडण्याकरता आणि एकत्रित रित्या कृती करण्यासाठी भारत जी 20 जागतिक स्तरावर प्राईम मूव्हर म्हणून कार्यरत राहील असंही त्यांनी सांगितलं.
आर्थिक आणि मध्यवर्ती बँक प्रतिनिधींच्या बैठकीचं सह अध्यक्ष पद आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ आणि भारतीय रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉक्टर मायकल डी पात्रा करणार आहेत. जी 20 सदस्य देशांचे त्यांचे समकक्ष तसंच भारताने निमंत्रित केलेले इतर देशांचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होतील.
जी 20 आर्थिक पाठपुराव्यात जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित विषय, जागतिक आर्थिक दृष्टिकोनाचा समावेश,आंतरराष्ट्रीय आर्थिक संरचना, पायाभूत सुविधांचा विकास आणि अर्थ पुरवठा, शाश्वत अर्थ पुरवठा, जागतिक आरोग्य, आंतरराष्ट्रीय करव्यवस्था आणि आर्थिक क्षेत्राच्या बाबी तसच आर्थिक समावेशकता अशा काही महत्त्वाच्या विषयांचा समावेश असेल.
बंगरूळू बैठकीत जी-२० अध्यक्षते अंतर्गत अर्थ पाठपुरावा विषय पत्रिकेचा समावेशअसेल.
२१ व्या शतकातल्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांची पुनर्स्थापना,भविष्यकालीन शहरांना अर्थ पुरवठा, जागतिक कर्ज असुरक्षितता व्यवस्थापन, आर्थिक समावेशकता पुढे नेणे आणि उत्पादकता लाभ, पर्यावरण कृती आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाना अर्थ पुरवठा करणे आणि निराधार क्रिप्टो चलनांबाबत समन्वयाची भूमिका आणि आंतरराष्ट्रीय करव्यवस्था विषय पत्रिका पुढे नेणे या महत्वाच्या विषयांचा यात समावेश असेल.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, ‘21 व्या शतकातील सामायिक जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुपक्षीय विकास बँकांचे बळकटीकरण’ या विषयावर सविस्तर पॅनल चर्चा होणार आहे. ‘हरित वित्तपुरवठ्यात केंद्रीय बँकांची भूमिका’ या विषयावरही चर्चासत्र होणार आहे.
भारतीय जी 20 अध्यक्षपदाची ‘एक पृथ्वी एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना जी 20 च्या आर्थिक विषयावरील चर्चेला मार्गदर्शन करेल. आर्थिक विषयावरील(फायनान्स ट्रॅकच्या) अशा अंदाजे 40 बैठका भारतातील अनेक ठिकाणी आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये जी 20 वित्त मंत्री आणि रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांच्या बैठकांचा समावेश आहे. जी 20 मधील या आर्थिक विषयावरील चर्चेचा घोषवारा शेवटी जी 20 नेत्यांच्या घोषणेमधून दिसून येईल.
भारताने अनेक आव्हानांच्या वेळी जी 20 परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे, ज्यात कोविड-19 साथीच्या रोगामुळे उद्भवणारे परिणाम, तीव्र भू-राजकीय तणाव, वाढत्या अन्न आणि ऊर्जा सुरक्षेची चिंता, वाढत्या कर्जाचा बोजा, महागाईचा दबाव आणि कडक आर्थिक धोरणं यांचा समावेश आहे. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन प्रदान करणे ही जी 20 परिषदेची ची प्रमुख भूमिका आहे.
भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात, सर्वात जास्त गरज असलेल्या देशांना मदत करणे आणि विकसनशील देशांच्या चिंता आणि आकांक्षा प्रतिबिंबित करणे हे मुद्दे जी 20 परिषदेच्या प्रयत्नांमध्ये प्रमुख असतील. अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक आजच्या जागतिक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच एका उज्ज्वल भविष्याची निर्मिती करण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक पद्धतीने जी 20 सबंधित आर्थिक निती राबवतील.
****
Mahesh C/Sandesh N/Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1882459)