माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बहु -प्रणाली ऑपरेटरद्वारा दिल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म सेवांसाठी मार्गदर्शक तत्त्वे केली जारी

Posted On: 30 NOV 2022 4:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2022

  1. केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, 1994, बहु -प्रणाली  ऑपरेटरला (एमएसओ)  त्यांची स्वतःची प्रोग्रामिंग सेवा थेट त्यांच्या स्वतःच्या सदस्यांना किंवा एक किंवा अधिक स्थानिक केबल ऑपरेटर्सच्या माध्यमातून प्रसारित करण्याची परवानगी देतो. 'प्लॅटफॉर्म सर्व्हिसेस ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रोग्रामिंग सेवा असून यात बहुतांश 'स्थानिक-चॅनेल्स ' देखील समाविष्ट आहेत आणि त्या बहु-प्रणाली ऑपरेटरद्वारे स्थानिक स्तरावर निर्माण केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रोग्रामिंग सेवा आहेत.
  2. केबल टेलिव्हिजन नेटवर्क अधिनियम , 1994 च्या नियम 6(6) नुसार; या मंत्रालयाने 30.11.2022 रोजी भारतात बहु -प्रणाली ऑपरेटर्सद्वारे  प्रदान केलेल्या 'प्लॅटफॉर्म सेवा' संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या  मार्गदर्शक तत्वांमध्ये  ‘प्लॅटफॉर्म सेवा’ ची व्याख्या दिली आहे  आणि प्लॅटफॉर्म सेवा चालवण्यासाठी बहु -प्रणाली ऑपरेटर्ससाठी निकष दिले आहेत, ते पुढीलप्रमाणे:
  • प्रत्येक पीएस चॅनेलसाठी 1,000 रुपये या किरकोळ शुल्कात एमएसओद्वारे पीएस चॅनेलसाठी सोपी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया. यासाठी  ऑनलाइन नोंदणी पोर्टल तयार केले जात आहे आणि लवकरच ते अधिसूचित  केले जाईल.
  • केवळ कंपन्या म्हणून नोंदणीकृत आस्थापनांना चालू घडामोडी आणि स्थानिक बातम्या देण्याची  परवानगी आहे. जे बहु-प्रणाली ऑपरेटर्स  "कंपनी" म्हणून नोंदणीकृत नाहीत , मात्र स्थानिक बातम्या आणि चालू घडामोडी देऊ इच्छितात , त्यांनी  "कंपनी" मध्ये रूपांतर करण्यासाठी कंपनी  व्यवहार मंत्रालयाकडे 3 महिन्यांच्या आत अर्ज करणे अनिवार्य आहे.
  • प्रति ऑपरेटर परवानगी असलेल्या पीएस चॅनेलची एकूण संख्या एकूण चॅनल कॅरेज क्षमतेच्या 5% पर्यंत मर्यादित ठेवली जाईल.
  • ग्राहकांच्या स्थानिक भाषा आणि संस्कृतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, पीएस चॅनेलवरील या मर्यादेची गणना राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरावर केली जाईल. तसेच, या व्यतिरिक्त, जिल्हा स्तरावर स्थानिक आशयाची  आवश्यकता पूर्ण करण्यासाठी  प्रत्येक जिल्हा  स्तरावर 2 पीएस चॅनेलला परवानगी दिली जाईल.
  • नोंदणीकृत टीव्ही चॅनेल आणि पीएस मधला फरक दर्शवण्यासाठी   सर्व पीएस चॅनेल्सनी ‘प्लॅटफॉर्म सर्व्हिसेस’ असा मथळा ठेवावा.
  • पीएसचा आशय केवळ प्लॅटफॉर्मसाठीच असावा आणि इतर कोणत्याही वितरण प्लॅटफॉर्म ऑपरेटरबरोबर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सामायिक केला जाऊ नये. मात्र, मंदिरे, गुरुद्वारा इत्यादी धार्मिक स्थळांमधून थेट फीड शेअर करायला  परवानगी असेल.
  • ट्रायचे लागू आदेश / निर्देश / नियमांनुसार,  इलेक्ट्रॉनिक प्रोग्राम गाईड (EPG) मधील  'प्लॅटफॉर्म सर्व्हिसेस' श्रेणी अंतर्गत सर्व पीएस चॅनेल त्यांच्या कमाल किरकोळ किंमतीसह आणि पीएस ऍक्टिव्हेट/डिऍक्टिव्हेट करण्यासाठीच्या  पर्यायासह एकत्र ठेवले जातील.
  • पीएस प्रदान करणाऱ्या बहु-प्रणाली ऑपरेटरनी 90 दिवसांच्या कालावधीसाठी सर्व पीएस  चॅनेल कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग जपून ठेवावे.
  • सीटीएन कायदा, 1995, आणि राज्य/जिल्हा देखरेख समिती अंतर्गत विहित केलेल्या अधिकृत अधिकाऱ्याकडून आशय  सामग्रीशी संबंधित कोणत्याही तक्रारीची तपासणी केली जाईल.
  • बहु-प्रणाली ऑपरेटर्सना 30 नोव्हेंबर 2022 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
  1. नोंदणीकृत टीव्ही चॅनेल्सच्या वितरणासाठी केबल ऑपरेटरना नोंदणी देण्यात आली आहे.  केबल ऑपरेटर्सची नेटवर्क क्षमता प्रामुख्याने त्यासाठी वापरली जाईल याची खातरजमा करण्यासाठी वरील मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. तसेच, बहु-प्रणाली ऑपरेटर्सना  त्यांच्या ग्राहकांकडून स्थानिक आशय सामग्रीची मागणी पूर्ण करता यावी यासाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पुरेशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसेच,  ही मार्गदर्शक तत्त्वे पीएस चॅनेलवरील सामग्रीच्या संदर्भात कार्यक्रम संहिता आणि जाहिरात संहितेचे पालन करणे, 90 दिवसांपर्यंत रेकॉर्डिंग जपून ठेवणे इत्यादींचे पालन अनिवार्य केले असून  याद्वारे पायरसीच्या  धोक्याचा सामना करण्यास मदत करेल.

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1879989) Visitor Counter : 199