राष्ट्रपती कार्यालय
पाच देशांच्या राजदूतांनी भारताच्या राष्ट्रपतींना ओळखपत्र सादर केली
Posted On:
28 NOV 2022 2:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2022
भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (28 नोव्हेंबर 2022) राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात बांगलादेश, मालदीव, संयुक्त अरब अमिराती, लाटविया आणि जपानच्या उच्चायुक्त/राजदूतांकडून ओळखपत्रे स्वीकारली. ज्यांनी मुर्मू यांना ओळखपत्रे सादर केली त्यांचा तपशील:
- महामहीम मुस्तफिजुर रहमान, पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेशचे (बांगलादेश प्रजासत्ताकचे) उच्चायुक्त
- महामहीम इब्राहिम साहेब, मालदीव प्रजासत्ताकचे उच्चायुक्त
- महामहीम डॉ अब्दुलनासर जमाल हुसेन मोहम्मद अलशाली, संयुक्त अरब अमिरातीचे राजदूत
- महामहीम ज्युरिस बोन, लाटविया प्रजासत्ताकचे राजदूत
- महामहीम सुझुकी हिरोशी, जपानचे राजदूत
S.Kane/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879504)
Visitor Counter : 189