पंतप्रधान कार्यालय
गोवा रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
24 NOV 2022 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2022
नमस्कार.
गोवा सरकारने आज युवकांना रोजगार देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अनेक तरुणांना आज गोवा सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये सामूहिक नेमणूक पत्र दिली जाणार आहेत. नेमणूक पत्र मिळणार असलेल्या सर्व युवकांचे आणि त्यांच्या आई-वडिलांचेही खूप खूप अभिनंदन. पुढील काही महिन्यांमध्ये गोवा पोलीसांसह इतर विभागांमध्येसुद्धा भर्ती होणार आहे असं मला सांगितलं गेलं आहे. यामुळे गोवा पोलीस विभाग अधिक मजबूत होईल आणि नागरिकांसाठीच्या विशेषतः पर्यटकांसाठीच्या सुरक्षेत मोठी वाढ होईल.
मित्रहो,
गेल्या काही आठवड्यांमध्ये देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये सातत्याने रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र सरकारसुद्धा भारत सरकारच्या विभागांमध्ये प्रत्येक महिन्याला हजारो युवकांना नोकरी देत आहे. जिथे जिथे भाजपाची सरकारे आहेत, डबल इंजिन सरकार आहे तेथे राज्य सरकार सुद्धा आपल्या पातळीवर अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन करत आहे याचा मला आनंद आहे.
मित्रहो,
गेल्या आठ वर्षात केंद्र सरकारने गोव्याच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मोपामध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन विमानतळाचे लोकार्पण लवकरच होणार आहे. या विमानतळाच्या निर्माणाशी संबंधित अनेक कामांमध्ये गोव्यातल्या हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. याच प्रकारे आज गोव्यात कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प सुरू आहेत, मूलभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्येसुद्धा गोव्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. स्वयंपूर्ण गोवा हे स्वप्न, गोव्यातील मूलभूत सुविधा उत्तम करण्यासोबतच पायाभूत सुविधाही उत्तम उभ्या करत आहे. 'गोवा पर्यटन मास्टर प्लॅन आणि धोरण', या माध्यमातून राज्य सरकारने गोव्याच्या विकासाची नवीन रूपरेषा सुद्धा आखली आहे. पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूक आणि रोजगार मोठ्या प्रमाणावर वाढण्याच्या नव्या संधी यामुळे झाल्या आहेत.
मित्रहो,
गोव्यातील ग्रामीण भागांना सुद्धा आर्थिक बळ देण्यासाठी आणि पारंपारिक शेतीमध्ये रोजगार वाढवण्यासाठी नवीन पावले उचलली जात आहेत. तांदूळ, फळप्रक्रिया , नारळ आणि मसाल्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना स्वयं सहायता जोडले जात आहे. गोव्यात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक नव्या संधी आकाराला येत आहेत.
मित्रहो,
आज ज्या युवकांना गोव्यात पत्रे मिळाली आहेत त्यांना मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची अशी 25 वर्ष आता सुरू होत आहेत. आता आपल्या समोर गोव्याच्या विकासाबरोबरच 2047 च्या नवीन भारताचे उद्दिष्ट आहे. आपल्याला गोव्याच्या विकासासाठीसुद्धा काम करायचे आहे, त्याचबरोबर आपण सर्वांनी संपूर्ण निष्ठेने आणि तत्परतेने आपल्या कर्तव्य पथावर मार्गक्रमणा करत रहावे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद!
S.Kakade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878606)
Visitor Counter : 256
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam