इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करा: युआयडीएआय
योग्य प्रकारे ओळख पटवण्यासाठी आणि कुठल्याही संभाव्य गैरवापराला आळा घालण्यासाठी आधारची पडताळणी करा
Posted On:
24 NOV 2022 5:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2022
एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आधार स्वीकारण्यापूर्वी, संस्थांनी आधारची पडताळणी करणे आवश्यक आहे.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ने नमूद केले आहे की आधार धारकाच्या संमतीनंतर आधार क्रमांकाची पडताळणी करणे हे एखाद्या व्यक्तीने सादर केलेल्या कोणत्याही प्रकारच्या आधार (आधार पत्र, ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड, आणि एम-आधार) खरेपणा तपासण्यासाठी योग्य पाऊल आहे.
यामुळे अप्रामाणिक आणि असामाजिक घटक कोणत्याही संभाव्य गैरवापरात सहभागी होण्याला आळा बसतो. हे कोणताही 12-अंकी क्रमांक आधार नाही या युआयडीएआयच्या भूमिकेचे समर्थन करते. आधार दस्तावेजांची छेडछाड झाली असल्यास ऑफलाइन पडताळणीद्वारे त्याचा शोध घेता येऊ शकतो. छेडछाड हा दंडनीय गुन्हा असून आधार कायद्याच्या कलम 35 अंतर्गत दंडास पात्र आहे.
युआयडीएआय ने वापरापूर्वी आधार पडताळणीच्या आवश्यकतेवर भर देण्याची राज्य सरकारांना विनंती केली आहे आणि राज्यांना आवश्यक निर्देश देण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून जेव्हा ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार सादर केले जाईल - तेव्हा आधार वापरून संबंधित संस्थेद्वारे रहिवाशाचे प्रमाणीकरण/पडताळणी केली जाईल.
युआयडीएआयने संस्थाना प्रमाणीकरण/पडताळणीसाठी विनंती केली असून तसे अधिकार देणारी परिपत्रके देखील जारी केली आहेत ज्यात पडताळणीच्या आवश्यकतेवर भर आणि प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे.
mAadhaar App, किंवा Aadhaar QR कोड स्कॅनर वापरून सर्व प्रकारच्या आधार (आधार पत्र , ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड आणि m-Aadhaar) वर उपलब्ध QR कोड वापरून कोणत्याही आधारची पडताळणी केली जाऊ शकते. QR कोड स्कॅनर Android आणि iOS आधारित मोबाइल फोन तसेच विंडो-आधारित ऍप्लिकेशनसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.
रहिवासी स्वेच्छेने त्यांचे आधार कागद किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करून त्यांची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांक वापरू शकतात. युआयडीएआयने यापूर्वीच रहिवाशांसाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल माहिती प्रसिद्ध केली असून रहिवासी आत्मविश्वासाने त्यांचे आधार वापरू शकतात.
S.Kakade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1878595)
Visitor Counter : 308