पंतप्रधान कार्यालय
बिहारमध्ये वैशाली इथे झालेल्या अपघातातील जीवितहानी बद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
पीएमएनआरएफ मधून मदतनिधीची घोषणा
Posted On:
20 NOV 2022 11:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2022
बिहारमध्ये वैशाली इथे झालेल्या अपघातातील जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) अपघातातील मृतांच्या वारसाला 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतनिधीची घोषणाही पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीट संदेशात म्हटले आहे;
"बिहार मधील वैशाली इथे झालेला अपघात दुःखदायक आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) अपघातातील मृतांच्या वारसाला 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांचा मदत निधी दिला जाईल. पंतप्रधान @narendramodi"
S.Tupe/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1877621)
अभ्यागत कक्ष : 226
Read this releasein:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam