पंतप्रधान कार्यालय
विक्रम-एस या भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी इस्रो आणि इन-स्पेस यांचे केले अभिनंदन
Posted On:
18 NOV 2022 5:26PM by PIB Mumbai
विक्रम-एस अर्थात विक्रम सबऑर्बिटल या स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने विकसित केलेल्या भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संघटना तसेच इन-स्पेस अर्थात भारतीय राष्ट्रीय अवकाश कार्यक्रम प्रोत्साहन आणि अधिकृतता केंद्र या संस्थांचे अभिनंदन केले आहे.
ट्विट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
“स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेल्या विक्रम-एस या रॉकेटने आज श्रीहरीकोटा येथून उड्डाण केले, भारतासाठी हा अत्यंत ऐतिहासिक क्षण! भारताच्या खासगी अवकाश क्षेत्राच्या प्रवासातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या कामगिरीसाठी सक्षम केल्याबद्दल @isro आणि @INSPACeIND यांचे अभिनंदन.”
“ही सफलता म्हणजे जून 2020 मध्ये देशाच्या अवकाश क्षेत्रात झालेल्या महत्त्वाच्या सुधारणांचा पुरेपूर फायदा करून घेणाऱ्या आपल्या युवा वर्गाच्या अमर्याद प्रतिभेचा पुरावा आहे.”
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1877142)
Visitor Counter : 252
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam