पंतप्रधान कार्यालय
बाली येथे जी -20 शिखर परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्रपती आणि इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींसोबत पंतप्रधानांची बैठक
Posted On:
15 NOV 2022 9:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष महामहीम जोसेफ आर. बायडेन आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती महामहीम जोको विडोडो यांची आज बाली येथे जी 20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली.
जी -20 हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचे प्रमुख व्यासपीठ असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. तसेच जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी प्रमुख अर्थव्यवस्थांना एकत्र आणण्याची क्षमता जी20 व्यासपीठ सातत्याने दाखवत असल्याचे सांगत जी 20 चे महत्व त्यांनी अधोरेखित केले. जी -20 आपल्या अर्थव्यवस्थांमध्ये आणि त्याही पलीकडे शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास पुनर्स्थापित करण्यासाठी, सध्याच्या हवामान, ऊर्जा आणि अन्नधान्य संकटांना तोंड देण्यासाठी, जागतिक आरोग्य संरचना मजबूत करण्यासाठी आणि तंत्रज्ञान विषयक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र काम करत आहे.
आपल्या अध्यक्षपदाच्या काळात भारत इतर विकसनशील देशांचा आवाज बनेल याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. असुरक्षित देशांना मदत करणे ; सर्वसमावेशक विकासाला सहाय्य करणे , आर्थिक सुरक्षा आणि जागतिक पुरवठा साखळी मजबूत करणे; बहुपक्षीय वित्तीय संस्थांसाठी सुधारित आणि अभिनव वित्तपुरवठा मॉडेल विकसित करणे; हवामान बदल, महामारी, अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती , गरीबी कमी करणे आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करणे यासारख्या आव्हानांवर तोडगा काढणे आणि पायाभूत सुविधांमधील तफावत दूर करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी वित्तपुरवठा करण्यात जी 20’ची महत्वपूर्ण भूमिका असल्यावर त्यांनी भर दिला.
भारताच्या अध्यक्षतेखाली जी -20 च्या कार्याला पाठिंबा देण्याच्या वचनबद्धतेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती विडोडो आणि अध्यक्ष बायडेन यांचे आभार मानले.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1876292)
Visitor Counter : 148
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam