अर्थ मंत्रालय

महसूलातली तूट भरुन काढण्यासाठी 14 राज्यांना केंद्र सरकारकडून 7,183.42 कोटी रुपये निधी अनुदानापोटी वितरित


चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत राज्यांना महसूल तूट अनुदानापोटी 57,467.33 कोटी रुपये वितरित

राज्य सरकारांना आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये महसूल तूट अनुदान म्हणून एकूण 86, 201 कोटी रक्कम वितरित केली जाणार

Posted On: 07 NOV 2022 3:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2022

 

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील व्यय विभागानं आज राज्यांना महसुलातील तूट भरून काढण्यासाठीच्या, पोस्ट डिव्होल्युशन रेव्हेन्यू डेफिसिट- पीडीआरडी म्हणजे हस्तांतरणोत्तर महसूल तूट अनुदानाचा आठवा मासिक हप्ता म्हणून 7,183 कोटी 42 लाख रुपयांचे अनुदान वितरीत केले. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसींनुसार हे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

पंधराव्या वित्त आयोगाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 14 राज्यांना पोस्ट डिव्होल्युशन रेव्हन्यू डेफिसिट अनुदानापोटी एकूण 86,201 कोटी रुपये देण्याची शिफारस केली आहे. आयोगाने शिफारस केलेले हे अनुदान व्यय विभागातर्फे राज्यांना 12 समान मासिक हप्त्यांमध्ये वितरीत केले जात आहे. आज देण्यात आलेल्या, नोव्हेंबर 2022 महिन्याच्या आठव्या  मासिक हप्त्यानंतर राज्यांना 2022-23 मध्ये आतापर्यंत वितरीत झालेल्या अनुदानाची रक्कम आता 57,467 कोटी 33  लाख रुपये इतकी झाली आहे

राज्यघटनेच्या कलम 275 नुसार केंद्र सरकारकडून राज्यांना हस्तांतरणोत्तर महसूल तूट अनुदान दिले जाते. हस्तांतरणानंतर राज्यांच्या महसूल खात्यातली तफावत भरून काढण्याच्या उद्देशाने सर्व  वित्त आयोगांच्या शिफारसींनुसार राज्यांना अनुदान वितरीत केले जाते.

हे अनुदान मिळण्यासाठी राज्यांची पात्रता आणि 2020-21 ते 2025-26 या कालावधीसाठी अनुदानाचे प्रमाण हे पंधराव्या आयोगाने राज्याच्या महसूल आणि खर्चाच्या मूल्यांकनातील तफावतीच्या आधारे निश्चित करण्यात आले आहे.

2022-23 या आर्थिक वर्षात पंधराव्या वित्त आयोगाने ज्या राज्यांना हस्तांतरणोत्तर महसूल तूट अनुदानाची शिफारस केली आहे ती पुढीलप्रमाणे आहेत: आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल.

2022-23 या आर्थिक वर्षासाठी शिफारस केलेल्या हस्तांतररणोत्तर महसूल तूट अनुदानाचा राज्यनिहाय तपशील आणि आठवा हप्ता म्हणून राज्यांना वितरीत करण्यात आलेली रक्कम खालीलप्रमाणे आहे:

हस्तांतरणोत्तर महसूल तुटीपोटी वितरित राज्यनिहाय निधी

(रुपये कोटींमध्ये)

S. No.

Name of State

8th instalment released for the month of November, 2022.

Total PDRDG released to States during 2022-23.

1

Andhra Pradesh

879.08

7032.67

2

Assam

407.50

3260.00

3

Kerala

1097.83

8782.67

4

Manipur

192.50

1540.00

5

Meghalaya

86.08

688.67

6

Mizoram

134.58

1076.67

7

Nagaland

377.50

3020.00

8

Punjab

689.50

5516.00

9

Rajasthan

405.17

3241.33

10

Sikkim

36.67

293.33

11

Tripura

368.58

2948.67

12

Uttarakhand

594.75

4758.00

13

West Bengal

1132.25

9058.00

 

 

 

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1874242) Visitor Counter : 165