पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 च्या समारोपानंतर पंतप्रधानांनी खेळाडूंना दिल्या शुभेच्छा
Posted On:
13 OCT 2022 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2022
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि पदक जिंकणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 च्या भव्य यशासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की, स्पर्धेसाठी उभारण्यात आलेल्या क्रीडाविषयक पायाभूत सुविधांचे खेळाडूंनी भरभरून कौतुक केले आणि प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर, कचरा कमी करणे आणि स्वच्छता वाढवण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासह शाश्वततेवर लक्ष केंद्रित केल्याबद्दल ही क्रीडा स्पर्धा लक्षात राहील. आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातच्या लोकांची आणि सरकारची प्रशंसा केली.
ट्विटच्या मालिकेत पंतप्रधानांनी ट्विट केले;
“राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 चा काल समारोप झाला. या स्पर्धेत भाग घेतलेल्या आणि खिलाडूवृत्ती वृद्धिंगत करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला मी सलाम करतो .या क्रीडा स्पर्धांमध्ये पदक जिंकणाऱ्या सर्वांचे अभिनंदन. त्यांच्या कर्तबगारीचा अभिमान आहे. सर्व खेळाडूंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.”
“यंदाची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा विविध कारणांसाठी खास होती. क्रीडा संबंधी पायाभूत सुविधांचे खेळाडूंनी भरभरून कौतुक केले. पारंपरिक खेळांमधील व्यापक सहभाग हे देखील ठळक वैशिष्ट्यांपैकी एक होते.”
प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर ,कचरा कमी करणे आणि स्वच्छता वाढवण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासह शाश्वततेवर लक्ष केंद्रित केल्याबद्दल ही क्रीडा स्पर्धा लक्षात राहील.या क्रीडा स्पर्धेदरम्यान केलेल्या आदरातिथ्याबद्दल मी गुजरातच्या लोकांची आणि सरकारची प्रशंसा करू इच्छितो''.
S.Kane/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1867571)
Visitor Counter : 289
Read this release in:
Bengali
,
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam