युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तीन दिवसीय “वाडा ॲथलिट शारीरिक तपासणीविषयक अहवाल परिसंवाद - 2022” च्या उद्‌घाटन सत्रात अनुराग ठाकूर यांचे भाषण

Posted On: 12 OCT 2022 4:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12  ऑक्टोबर  2022

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत तीन दिवसीय वाडा ॲथलिट शारीरिक तपासणीविषयक अहवाल (ॲथलिट बायोलॉजिकल पासपोर्ट) परिसंवाद - 2022 च्या उद्‌घाटन सत्राला संबोधित केले. राष्ट्रीय डोपिंगरोधी संस्था (NADA)  तसेच राष्ट्रीय डोपिंग चाचणी प्रयोगशाळा (NDTL) यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी, राष्ट्रीय डोपिंगरोधी संस्थेच्या महासंचालक रितू सैन, सहसंचालक (ॲथलिट शारीरिक तपासणी) जागतिक डोपिंगरोधी संस्था डॉ रीड आईकीन, संचालक, आशिया/ओशियाना कार्यालय, जागतिक डोपिंगरोधी संस्था काझुगीरो हायाशी तसेच वरिष्ठ व्यवस्थापक जागतिक डोपिंगरोधी संस्था डॉ नॉर्बर्ट बाउमे देखील या प्रसंगी उपस्थित होते.

ठाकूर यांनी ॲथलिट शारीरिक तपासणी हे डोपिंग विरोधात आणि संबंधित संशोधनात अतिशय महत्वाचे वैज्ञानिक शस्त्र असल्याचे अधोरेखित केले. यामुळे डोपिंगचा शोध तर लावता येतोच पण खेळाडूंना त्यापासून परावृत्त देखील केले जाऊ शकते. त्यांनी आशा व्यक्त केली की, या परिसंवादातून ॲथलिट शारीरिक तपासणीत उत्क्रांती आणि त्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात मैलाचा दगड ठरेल. अनुराग ठाकूर यांनी या परिसंवादात सहभागी झालेल्या सर्वांनी या संधीचा फायदा घेऊन आपले ज्ञान वाढवून घ्यावे, विविध टूल्स, संशोधन यातून आपले खेळाडू आणि संपूर्ण क्रीडा जगताचे डोपिंगच्या समस्येपासून संरक्षण करावे, असे आवाहन केले. या परिसंवादातून भारतात डोपिंगरोधी कार्यक्रमाला बळ देणे शक्य होईल, असे ते पुढे म्हणाले.

भारत सरकारने अलीकडेच राष्ट्रीय डोपिंगरोधी कायदा, 2022 मंजूर केला आहे, जे या सरकारचे बऱ्याच काळापासूनचे ध्येय होते. हा कायदा म्हणजे जागतिक डोपिंगरोधी मोहिमेत भारताच्या अविचल कटिबद्धतेचे द्योतक आहे, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरात, आम्ही जागतिक डोपिंगरोधी संस्थेत योगदान वाढविले आहे, आणि आता आमचे योगदान आशियात चौथे सर्वात मोठे योगदान आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. दिव्यांग ॲथलिट्स करिता सर्वसमावेशक संपर्क कार्यक्रम विकसित करण्यात आला आहे. जागतिक शैक्षणिक कार्यक्रमाच्या धर्तीवर चिन्हांच्या भाषेत डोपिंगविरोधी शैक्षणिक मोड्यूल केवळ भारतातील दिव्यांग ॲथलिट्सच्याच नव्हे तर जगात कुठेही उपयोगी पडतील. नाडा हे साहित्य आशियातील इतर नाडो संस्थाना देखील वितरीत करत आहे.

 

 

 

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1867076) Visitor Counter : 256