महिला आणि बालविकास मंत्रालय

महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीने उद्या मुलींसाठी “बेटियॉं बने कुशल” या 'उपजीविकेसाठी अपारंपरिक कौशल्ये' विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्या आयोजन

Posted On: 10 OCT 2022 10:54AM by PIB Mumbai

 10 ऑक्टोबर 2022

महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या(MWCD)वतीने उद्या दिनांक 11ऑक्टोबर, 2022 या आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त 'बेटी बचाओ,बेटी पढाओ' या कार्यक्रमाअंतर्गत मुलींसाठी अपारंपरिक उपजीविका  कौशल्यांवर आधारीत "बेटियॉं बने कुशल” नावाच्या एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या परिषदेद्वारे ज्या व्यवसायांमध्ये ऐतिहासिक काळापासून  मुलींना कमी  प्रतिनिधित्व  मिळाले आहे,अशा 

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या क्षेत्रांसह विविध व्यवसायांमध्ये काम करण्यासाठी संधी  सुनिश्चित करण्यासाठी मुलींमध्ये कौशल्ये निर्माण करणे यासाठी विविध मंत्रालये आणि विभाग यांच्यातील अभिमुखतेवर भर दिला जाईल. 

या कार्यक्रमात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) आणि अल्पसंख्याक कार्य मंत्रालय यांच्यासोबत युवतींच्या कौशल्य विकासासह  त्यांच्या  रोजगारातील समान आणि सशक्त सहभागासाठी विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात येतील.  मिशन शक्ती यातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार केलेल्या बदलांसह योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य/जिल्ह्यांच्या मार्गदर्शनासाठी बेटी बचाओ,बेटी पढाओ(BBBP) कार्यवाही सूचना पत्रक (ऑपरेशनल मॅन्युअल) देखील यावेळी प्रकाशित केले जाईल.

 “बेटियां बने कुशल” या कार्यक्रमाचे देशव्यापी थेट प्रसारण ही करण्यात  येणार असून सर्वसाधारण प्रेक्षकांसह महिला आणि बालविकास मंत्रालय, (MWCD), कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE), क्रीडा विभाग,अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, शैक्षणिक मंत्रालयासह  वैधानिक संस्था उदाहरणार्थ राष्ट्रीय बालहक्क संरक्षण समिती (नॅशनल कौन्सिल फॉर द प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स) यांचे प्रतिनिधी या परीषदेला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे 
(www.youtube.com/c/MinistryofWomenChildDevelopmentGovtofIndia) 

संपूर्ण भारतातील मुलींना आणि तरुणींना या कार्यक्रमातून नेतृत्वाचे वस्तुपाठ दिले जातील.

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री, श्रीमती स्मृती झुबिन इराणी आणि संपूर्ण भारतातून एनटीएल(NTL) मध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या किशोरवयीन मुली  यांच्यात  यावेळी संवाद सत्रे होतील.

यावेळी प्रकाशित होणाऱ्या बेटी बचाव, बेटी पढाव (BBBP) कार्यवाही परीपत्रकात (ऑपरेशनल मॅन्युअल) मार्गदर्शक तत्त्वे आणि उपलब्ध संधी या  विषयी माहिती दिली आहे.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MoSDE) आणि अल्पसंख्याक विकास मंत्रालय, यावेळी 21व्या शतकातील जीवन आणि रोजगारक्षमता कौशल्ये, उद्योजकता कौशल्ये, डिजिटल साक्षरता आणि आर्थिक साक्षरता कौशल्यांवर लक्ष केंद्रित करत मुलींबाबात असलेली आपली वचनबद्धता यांचे जाहीर प्रकटन या उपक्रमांद्वारे करतील.

***

Gopal C/Sampada/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1866408) Visitor Counter : 224