पंतप्रधान कार्यालय
गंधडा गुढी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर पंतप्रधानांनी या प्रकल्पाला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
09 OCT 2022 2:03PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंधडा गुढी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आहेत. दिवंगत कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आत्मियतेेचा हा प्रकल्प होता. कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण संवर्धनाला समर्पित असा हा गंधडा गुढी चित्रपट आहे. दिवंगत पुनीत राजकुमार यांनी जगभरातील लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळविले आहे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त यावेळी केली आहे.
दिवंगत कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार यांच्या ट्विटचा हवाला देत पंतप्रधानांनी ट्विट केले;
“अप्पू जगभरातील लाखो लोकांच्या हृदयात राहतील. ते तेजस्वी व्यक्तिमत्व, उर्जेने परिपूर्ण आणि अतुलनीय प्रतिभेने धनी होते. गंधडा गुढी हा चित्रपट निसर्ग मातेला, कर्नाटकचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित अशी भेट आहे. या प्रयत्नासाठी माझ्या शुभेच्छा.”
***
M.Jaybhaye/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1866220)
आगंतुक पटल : 266
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam