रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाहनांसाठीच्या बीएच (BH) मालिकेतील नियमांमधील सुधारणेसाठी मसुदा अधिसूचना जारी

Posted On: 07 OCT 2022 11:22AM by PIB Mumbai

वाहनांच्या भारत  (BH) मालिका नोंदणी चिन्ह नियामक नियमांमध्ये सुधारणा अधिसूचित करण्यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 04 ऑक्टोबर 2022 रोजी एक मसुदा अधिसूचना GSR 672 ( E ) जारी केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी जारी केलेल्या GSR 594 (E) या अधिसूचनेद्वारे नोंदणी चिन्ह लागू केले होते. या नियमांच्या अंमलबजावणी दरम्यान, बीएच मालिकेसंदर्भातली व्यवस्था  बळकट करण्यासाठी अनेक निवेदने प्राप्त झाली.

वाहनांची बीएच मालिकेच्या अंमलबजावणीची व्याप्ती वाढवण्याच्या तसेच सुधारणा करण्याच्या प्रयत्नात, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने  खालील प्रमुख वैशिष्ट्यांसह नवीन नियम प्रस्तावित केले आहेत:

 

1. बीएच  मालिका नोंदणीसाठी पात्र किंवा अपात्र असलेल्या इतर व्यक्तींना बीएच मालिका नोंदणी चिन्ह असलेली वाहने हस्तांतरित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

2. ज्या व्यक्ती नंतर बीएच मालिका नोंदणी चिन्हासाठी पात्र ठरतील त्यांच्या सोयीसाठी सध्या नियमित नोंदणी चिन्ह असलेली वाहने देखील आवश्यक कर भरण्याच्या अधीन राहून बीएच मालिका नोंदणी चिन्हात रूपांतरित केली जाऊ शकतात.

3. नागरिकांच्या अधिक जीवनमान सुलभतेसाठी, नियम 48 मध्ये दुरुस्ती करून बीएच मालिकेसाठी नोंदणी करण्याचा अर्ज रहिवास किंवा कामाच्या ठिकाणी सादर करण्याची लवचिकता प्रदान करण्यात आली आहे.

4. गैरवापर टाळण्यासाठी खाजगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांकडून सादर केले जाणारे कार्यरत प्रमाणपत्राचे नियम अधिक बळकट करण्यात आले आहेत.

राजपत्र अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

***

S.Thakur/S.Chavan/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1865761) Visitor Counter : 232