पंतप्रधान कार्यालय
गुजरातमधील वडोदरा येथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांना शोक
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून सानुग्रह मदत जाहीर
Posted On:
04 OCT 2022 5:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2022
गुजरातमधील वडोदरा येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख आणि शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे की,
''वडोदरा जिल्ह्यात रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले. शोकाकुल कुटुंबियांप्रति शोकसंवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो. प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल आणि जखमींना 50,000 रुपये दिले जातील.''
* * *
M.Pange/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1865129)
अभ्यागत कक्ष : 215
Read this releasein:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam