गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्षातील सर्वात मोठा शहरी स्वच्छता महोत्सव साजरा करण्यासाठी तयारी पूर्ण


भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वात स्वच्छ शहरांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार

Posted On: 30 SEP 2022 3:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2022

 

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (एमओएचयुए) वर्षातला सर्वात मोठा शहरी स्वच्छता महोत्सव आयोजित केला असून, 1 ऑक्टोबर 2022 रोजी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये होणार्‍या या सोहळ्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  Azaadi@75 स्वच्छ सर्वेक्षण 2022 मधील स्वच्छ राज्ये आणि शहरांचा सन्मान करतील. कचरा मुक्त शहरांची निर्मिती या महत्वाकांक्षी दृष्टिकोनाने 1 ऑक्टोबर 2021 रोजी पंतप्रधानांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियान-शहर 2.0 च्या पहिल्या वर्धापन दिना निमित्त, हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  

पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप पुरी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे (एमओएचयुए) राज्य मंत्री कौशल किशोर, शहरी विकास मंत्री आणि देशभरातील महापौर यांचा समावेश असून त्यांच्या उपस्थितीत विविध श्रेणींमधील  160 हून अधिक पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.  

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने  17सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या काळात आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे, जेव्हा स्वच्छ भारत अभियान (एसबीएम)-शहरला आठ वर्ष पूर्ण होत आहेत .

या पुरस्कार सोहळ्याचा उद्देश केवळ स्वच्छतेप्रति शहरांच्या अतूट समर्पणाला सलाम करणे, एवढाच अपेक्षित नसून, सर्वांसाठी अधिक स्वच्छ, आरोग्यमय आणि अधिक सर्वसमावेशक परिसंस्था निर्माण करण्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी शहरी भारताला केलेले आवाहन  आहे.    


* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1863743) Visitor Counter : 190