पंतप्रधान कार्यालय
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारांना पंतप्रधान उपस्थित
प्रविष्टि तिथि:
27 SEP 2022 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2022
टोक्यो येथील निप्पॉन बुडोकान येथे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारांना 20 हून अधिक देश /सरकारांच्या प्रमुखांसह 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना एक प्रिय मित्र आणि भारत-जपान भागीदारीचे महान पुरस्कर्ते मानणाऱ्या पंतप्रधानांनी आबे यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली.
शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारानंतर, पंतप्रधानांनी आकासाका पॅलेसमध्ये स्वर्गीय पंतप्रधान आबे यांच्या पत्नी अकी आंबे यांची खाजगी भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी श्रीमती आबे यांच्याकडे शोकभावना व्यक्त केल्या. भारत-जपान संबंधांना नवीन उंचीवर नेण्यासाठी माजी पंतप्रधान आबे यांनी दिलेला प्रेमळ मैत्रीचा हात आणि त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे त्यांनी स्मरण केले. त्यानंतर पंतप्रधानांनी पंतप्रधान किशिदा यांच्याशीही संवाद साधत शोक व्यक्त केला.
R.Aghor /S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1862592)
आगंतुक पटल : 231
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam