आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या भारतातील विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या नेतृत्व बैठकीचे डॉ. मनसुख मांडविया यांनी केले उद्‌घाटन

Posted On: 22 SEP 2022 2:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022

सेवा आणि सहयोग हे आपल्या परंपरेचे भाग असून ते आपल्या  संस्काराचा अविभाज्य घटक आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी आणि मानवतेच्या कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या  इंडियन रेडक्रॉस सोसायटीनेही कार्य करताना हे घटक स्वीकारून अधोरेखित केले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि आयआरसीएसचे (IRCS)  अध्यक्ष डॉ.मांडविया यांनी केले आहे.

या दोन दिवसीय चिंतनशिबिराचा उद्देश आयआरसीएसच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या पद्धती आणि त्याची साधने यांवर चर्चा करणे हा आहे. विविध राज्यांतील रेड क्रॉसचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच आयआरसीएसचे इतरही मान्यवर या बैठकीत सहभागी झाले होते.

आयआरसीएसच्या (IRCS) प्रशंसनीय कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना, डॉ मनसुख मांडविया म्हणाले की "रेड क्रॉस लोकांसाठी उमेद आणि "आशा" यासाठी ओळखली जाते.कोविड महामारीच्या काळामध्‍ये भारतातील आरोग्य सुविधांच्या प्रगतीबद्दल बोलताना, ते म्हणाले की,भारताने केवळ यशस्वी प्रादेशिक प्रारुपांद्वारे देशात कोविडचे व्यवस्थापन केले इतकेच नाही तर लस मैत्री (Vaccine Maitri) द्वारे अनेक देशांना औषधे आणि लसी उपलब्ध करून देत, विविध राष्ट्रांना  सहाय्य केले. यावरून आपल्या 'वसुधैव कुटुंबकम्' या तत्त्वज्ञानाचे सखोल दर्शन घडते, ही गोष्‍ट  त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

डॉ. मांडविया यांनी सहभागींना अनोखे उपक्रम हाती घ्यावेत  आणि आयआरसीएसच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याबाबत सूचना पाठविण्याचे आवाहन केले. यावेळी शिबिरार्थींनी  कार्याच्या सर्वोत्कृष्ट पद्धती आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नांविषयीचे  त्यांचे विचार खुलेपणाने प्रकट केले.

 

 S.Bedekar/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1861471) Visitor Counter : 196