पंतप्रधान कार्यालय
शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगेन यांच्याशी झाली बैठक
प्रविष्टि तिथि:
16 SEP 2022 11:05PM by PIB Mumbai
१. शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या निमित्ताने उझबेकीस्तानात समरकंद इथे काल 16 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगेन यांची भेट झाली.
२. दोन्ही नेत्यांनी या बैठकीत, भारत-तुर्की संबंधांचा आढावा घेतला. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमध्ये वाढत असलेल्या आर्थिक संबंधांची विशेषतः द्विपक्षीय व्यापाराची नोंद घेत, त्यांनी येत्या काळात दोन्ही देशांमध्ये, आर्थिक आणि व्यापारी संबंध वाढवण्याच्या दृष्टीने अधिक संधी आणि क्षमता असल्याचं नमूद केलं.
३. दोन्ही देशांच्या प्रमुखांनी, प्रादेशिक आणि जागतिक विकासाच्या दृष्टीने , आपापले विचार आणि मते या बैठकीत मांडली . .केवळ द्विपक्षीय संबंधांबाबतच नव्हे तर दोन्ही देशांच्या फायद्याच्या दृष्टीने आपापसात संपर्क कायम राखण्याबाबत उभय नेत्यांनी सहमती दर्शवली.
****
Sushama K/Ashutosh S/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1860020)
आगंतुक पटल : 282
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam