रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वितरकांद्वारे नोंदणीकृत वाहनांच्या होणाऱ्या विक्री आणि खरेदीमध्ये पारदर्शकता यावी तसेच व्यवसाय सुलभतेसाठी अधिसूचनेचा मसुदा जारी

Posted On: 15 SEP 2022 10:50AM by PIB Mumbai

वितरकांद्वारे नोंदणीकृत वाहनांच्या होणाऱ्या विक्री आणि खरेदीमध्ये पारदर्शकता यावी तसेच व्यवसाय सुलभतेसाठी 12 सप्टेंबर 2022 रोजी जी.एस.आर 693 (ई) या अधिसूचनेचा मसुदा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) जारी  केला आहे.

भारतात वापरलेल्या गाड्यांची बाजारपेठ हळूहळू बळकट होत आहे. अलिकडच्या काही वर्षांमधे वापरलेल्या वाहनांची ऑनलाईन खरेदी आणि विक्री करणाऱ्या व्यवस्थेच्या आरंभामुळे या बाजाराला आणखीच चालना मिळाली आहे.

संबंधिताकडे वाहन हस्तांतरित करताना तृतीय पक्षाच्या नुकसानीच्या दायित्वांबाबत विवाद, दोषी निश्चित करण्यात अडचण इ. अनेक समस्या सध्याच्या परिस्थितीत भेडसावत होत्या.

एमओआरटीएचने, वापरलेल्या गाड्यांच्या बाजारासाठी सर्वसमावेशक नियामक परिसंस्था तयार करण्याकरिता केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 च्या परिशिष्ट III मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत.

प्रस्तावित नियमांमधील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे आहेत.

1.वितरकांची सत्यता सिद्ध करण्यासाठी नोंदणीकृत वाहनांच्या वितरकांसाठी अधिकृतता प्रमाणपत्र सुरू केले आहे.

2.या व्यतिरिक्त, नोंदणीकृत मालक आणि वितरक यांच्यात वाहन वितरणाची सूचना देण्याची प्रक्रिया तपशीलवार दिली आहे.

3. नोंदणीकृत वाहने ताब्यात घेणाऱ्या वितरकाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या देखील स्पष्ट केल्या आहेत.

4. वितरकांना त्यांच्या ताब्यातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र/सक्षमता प्रमाणपत्राचे नूतनीकरण, नक्कल नोंदणी प्रमाणपत्र, ना हरकत, मालकीचे हस्तांतरण यासाठी अर्ज करण्याचा अधिकार दिला आहे.

5. नियामक उपाययोजना म्हणून, इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या फेऱ्यांच्या नोंदी ठेवणे अनिवार्य केले आहे. यात फेऱ्यांचा तपशील, उद्देश, चालक, वेळ, किती अंतर गाडी धावली इ. तपशील असेल.

या नियमांमुळे नोंदणीकृत वाहनांचे मध्यस्थ/विक्रेते ओळखण्यात आणि त्यांना सक्षम करण्यात मदत करणे तसेच अशा वाहनांच्या विक्री किंवा खरेदीसाठी फसव्या कारवायांपासून पुरेशी सुरक्षा प्रदान करणे अपेक्षित आहे.

तीस दिवसांच्या कालावधीत सर्व भागधारकांकडून टिप्पण्या आणि सूचना मागवल्या जात आहेत.
राजपत्र अधिसूचनेसाठी येथे क्लिक करा http://www.youtube.com/arthsastra

 

***


Gopal C/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1859517) Visitor Counter : 240