सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी उत्कृष्टता केंद्र 16 आणि 17 सप्टेंबर 2022 रोजी बेंगळुरू येथे आवर्तन हा दोन दिवसीय कार्यक्रम सादर करणार.
Posted On:
15 SEP 2022 10:52AM by PIB Mumbai
खादी मधील कलाकृती आधी हृदयाला स्पर्श करते आणि त्यानंतर डोळ्यात सामावते. - मोहनदास करमचंद गांधी
खादीला जनमानसाशी अधिकाधिक जोडण्याच्या दृष्टीने खादी उत्कृष्टता केंद्राने 16 आणि 17 सप्टेंबर 2022 रोजी, बेंगळुरू येथे बंगलोर इंटरनॅशनल सेंटर (BIC) येथे आवर्तन, हा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला आहे.
सूक्ष्म, लघु आणि उद्योग मंत्रालयाने राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या संयुक्त विद्यमाने खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला युवा वर्ग तसेच जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने खादी उत्कृष्टता केंद्र ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. नवी दिल्लीतील खादी उत्कृष्टता केंद्र हब आणि गांधीनगर, शिलाँग, कोलकाता आणि बेंगळुरू येथे त्यांच्या शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमात खादी उत्कृष्टता केंद्रातील डिझायनर्सद्वारे सर्व वयोगटातील लोकांसाठी डिझाइन केलेले घरगुती आणि पोशाख संग्रहाचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. खादी संस्थांना त्यांचे कापड आणि साड्यांचे विपणन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. खादी उत्कृष्टता केंद्रातील
खादी आणि खादीशी निगडित सर्व पैलूंवर परिसंवादाचे आयोजन केले आहे, त्यासाठी बेंगळुरूच्या डिझाईन कॉलेजमधील विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबर रोजी आमंत्रित करण्यात आले आहे. खादीची शाश्वतता आणि वारसा जपण्याच्या उद्देशाने "खादीला पुन्हा जनमानसाशी जोडणे, नवीन पिढीसाठी खादी आणि खादीसाठी डीएनए, याविषयांवरील परिसंवादाची तीन सत्रे यावेळी होणार आहेत.
***
Gopal C/B.Sontakke/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1859496)
Visitor Counter : 220