पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे
Posted On:
08 SEP 2022 11:30PM by PIB Mumbai
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे;
“महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे आमच्या काळातील महान व्यक्तिमत्व म्हणून स्मरण केले जाईल. त्यांनी आपला देश आणि तिथल्या नागरिकांना प्रेरणादायी नेतृत्व दिले. त्यांनी सार्वजनिक जीवनातील प्रतिष्ठा आणि सभ्यतेचे दर्शन घडवले. त्यांच्या निधनाने दुःख झाले. या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि युनायटेड किंगडमची जनता यांच्या दुःखात मी सहभागी आहे.”
“2015 आणि 2018 सालच्या युके दौर्यामध्ये एलिझाबेथ द्वितीय यांच्याबरोबरच्या माझ्या भेटी संस्मरणीय आहेत. त्यांचा प्रेमळ आणि दयाळूपणा मी कधीही विसरू शकत नाही. महात्मा गांधी यांनी त्यांच्या लग्नात त्यांना भेट म्हणून दिलेलेला रुमाल त्यांनी आमच्या एका भेटीत मला दाखवला होता. तो प्रसंग मी कायम स्मरणात ठेवीन.”
***
G.Chippalkatti/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1858140)
Visitor Counter : 106
Read this release in:
Punjabi
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam