पंतप्रधान कार्यालय

10 सप्टेंबर रोजी पंतप्रधान 'केंद्र-राज्य विज्ञान परिषदे'चे करणार उदघाटन


परस्पर सहकारी संघराज्य या भावनेने देशभरातील केंद्रीय आणि राज्य स्तरावरील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि सचिवांचा परीषदेत सहभाग

सुदृढ विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीसाठी अनुकूल परिसरसृष्टी निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेला हा पहिलाच प्रयत्न

Posted On: 09 SEP 2022 2:55PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उद्या दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे उदघाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

पंतप्रधानांच्या अथक प्रयत्नांनी देशात नवसंकल्पना आणि उद्योजकता रुजविण्यासाठी ही अशा प्रकारची पहिलीच परीषद असेल जी सहकारी संघराज्य भावनेने केंद्र-राज्य यांच्यात समन्वय आणि सहयोग यंत्रणा मजबूत करेल - आणि देशभरात एक सुदृढ विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना ( STI) परिसरसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.

दिनांक 10-11 सप्टेंबर 2022 रोजी सायन्स सिटी, अहमदाबाद येथे या दोन दिवसीय परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एसटीआय व्हिजन 2047 सह; राज्यांमधील एसटीआयच्या भविष्यातील विकासाचे मार्ग आणि दृष्टी; आरोग्य - सर्वांसाठी डिजिटल आरोग्य सेवा; 2030 पर्यंत संशोधन आणि विकास यासाठी खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक दुप्पट करणे; कृषी - शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी तांत्रिक हस्तक्षेप; पाणी - पिण्यायोग्य पिण्याचे पाणी तयार करण्यासाठी नावीन्यपूर्ण पध्दती; ऊर्जा- हायड्रोजन मिशनमध्ये एसॲन्डटीच्या भूमिकेसह सर्वांसाठी स्वच्छ ऊर्जा; सखोल सागरी अभियानांची किनारी राज्ये/केंद्रशासित प्रदेश तसेच देशाच्या भावी अर्थव्यवस्थेसाठी प्रासंगिकता,अशा विविध संकल्पनांवर आधारीत सत्रांचा समावेश असेल

अशा प्रकारच्या या पहिल्याच परीषदेत गुजरातचे मुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (S&T), विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि सचिव,उद्योग धुरीण,नवउद्योजक, बिगर सरकारी संस्था, तरुण वैज्ञानिक आणि विद्यार्थी यांचा सहभाग असेल.

***

G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858012) Visitor Counter : 204