वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

अमेरिकेतील भारतीय समुदायच 'वसुधैव कुटुंबकम' या भारतीय तत्त्वज्ञानाचे खरे राजदूत आहेत - गोयल


सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाच्‍यावतीने आयोजित स्वागत समारंभामध्‍ये गोयल यांनी केले मार्गदर्शन

Posted On: 07 SEP 2022 10:25AM by PIB Mumbai

अमेरिकेतील भारतीय समुदाय हे 'वसुधैव कुटुंबकम' (जग एक कुटुंबच आहे) या भारतीय तत्त्वज्ञानाचे खरे राजदूत आहेतअसे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगग्राहक व्यवहारअन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. भारतीय समुदायाने अमेरिकेत अभूतपूर्व मूल्य निर्मिती केल्याबद्दल तसेच नवीन तंत्रज्ञान आणि नवकल्पना यांच्याद्वारे योगदान आणि समर्थन देत भारताचे ऋण परत केल्याबद्दल त्यांनी  भारतीय समुदायाचे कौतुक केले. अमेरिकास्थित भारतीय समुदायाच्यावतीने  सॅन फ्रान्सिस्को येथे पीयूष गोयल यांच्‍या स्‍वागत  समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. यावेळी उपस्थित भारतीय समुदायाला गोयल यांनी मार्गदर्शन केले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001R4M9.jpg

सॅन फ्रान्सिस्को मध्ये 'इंडिया-यूएस स्टार्टअप सेतू' (SETU, Supporting Enterprener, for Transformation and Upskilling,परिवर्तन आणि कौशल्य विकासासाठी उद्योजकांना सहाय्यक) याचा आरंभ गोयल यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलाया उपक्रमाविषयी बोलताना मंत्री गोयल म्हणालेकी हा उपक्रम भारतीय आणि अमेरिकन कंपन्यांमध्ये सेतू म्हणून कार्य करेल आणि यूएस मधील भारतीय समुदायाच्या यशोगाथा समजून घेणेकौशल्य वाढवणे आणि त्याचा लाभ मिळविण्यासाठीभारतीय उद्योजकांना उपयुक्त ठरेल.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002BEXY.jpg

याप्रसंगी  गोयल म्हणाले कीपंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश आत्मनिर्भर होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.सेमीकंडक्टरविषयक धोरण, 13 क्षेत्रांतील उत्पादनाशी निगडित  प्रोत्साहन योजनाजागतिक स्तरावर परिचालन करणाऱ्या मोठ्या कारखान्यांच्या उपक्रमांबद्दलची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

भारतीय समुदायाने सण आणि इतर प्रसंगी भेटवस्तू देण्यासाठी ओडीओपीला ( एक जिल्हा एक उत्पादन) प्रोत्‍साहन देण्‍यासाठी भारतीय उत्पादने वापरावीत असे आवाहन करून श्री गोयल म्हणालेकी यामुळे भारतातील लाखो विणकर आणि कारागीरांना उपजीविका मिळेल.

यावेळी  गोयल म्हणाले कीभारतात उत्तम रीतीने परिवर्तन होत आहेदेश आज अधिक आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेअधिक आत्मनिर्भर आहे आणि अधिक प्रगती करण्याची आकांक्षा बाळगत आहे. पुढील 25 वर्षात विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने होणाऱ्या भारताच्या या प्रवासात भारतीय समुदायाने सहकार्य करावे आणि सहभागी व्हावेअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

***

SuvarnaB/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1857350) Visitor Counter : 128