पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बांगलादेशच्या पंतप्रधानांची भारत भेट

Posted On: 06 SEP 2022 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2022


A. द्विपक्षीय करार/सामंजस्य करार याची सूची:

Sr. No.

सामंजस्य करार/कराराचे नाव

भारताच्या बाजूने करार/सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली

बांगलादेशच्या बाजूने करार/सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली

1

भारत आणि बांगलादेशमधील सीमेवरच्या कुशियारा नदीमधील पाणी वाटपाबाबत   भारत सरकारचे जलशक्ती मंत्रालय आणि बांगलादेश सरकारचे जल संधारण मंत्रालय यांच्यातील  सामंजस्य करार.

पंकज कुमार, सचिव, जलशक्ती मंत्रालय

कबीर बिन अन्वर, वरिष्ठ सचिव, जल संधारण मंत्रालय

2

बांगलादेशच्या रेल्वे कर्मचाऱ्यांना भारतामध्ये प्रशिक्षण देण्याबाबत भारत सरकारचे रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड) आणि बांग्लादेश सरकारचे रेल्वे मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करार.

विनय कुमार त्रिपाठी, अध्यक्ष, रेल्वे बोर्ड

मुहम्मद इम्रान, बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्त

3

बांगलादेश रेल्वेसाठी FOIS आणि इतर IT ऍप्लिकेशन्स सारख्या माहिती तंत्रज्ञान  प्रणालींमध्ये सहकार्य करण्याबाबतचा भारत सरकारचे रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड) आणि बांगलादेश सरकारचे रेल्वे मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करार.

विनय कुमार त्रिपाठी, अध्यक्ष, रेल्वे बोर्ड

मुहम्मद इम्रान, बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्त

4

बांगलादेशच्या न्यायिक अधिकाऱ्यांसाठी भारतामध्ये  प्रशिक्षण आणि क्षमता विकास कार्यक्रम आयोजित करण्याबाबत भारताची राष्ट्रीय न्यायिक अकादमी आणि बांगलादेशचे सर्वोच्च न्यायालय यांच्यातील सामंजस्य करार.

विक्रम के दोराईस्वामी, बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त

मोहम्मद गोलाम रब्बानी, रजिस्ट्रार जनरल, बांगलादेश सर्वोच्च न्यायालय

5

भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि बांगलादेशची बांगलादेश वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (बीसीएसआयआर), यांच्यातील वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्याबाबतचा सामंजस्य करार.

डॉ एन कलैसेल्वी, महासंचालक, सीएसआयआर

डॉ.मो.आफताब अली शेख, अध्यक्ष बीसीएसआयआर

6

अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबतचा  सामंजस्य करार

डी. राधाकृष्णन, एनएसआयएल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

डॉ. शाहजहान महमूद, बीएससीएलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

7

प्रसार भारती आणि बांगलादेश टेलिव्हिजन (बीटीव्ही) यांच्यात प्रसारणातील सहकार्याबाबतचा सामंजस्य करार.

मयंक कुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रसार भारती

शोहराब हुसेन, महासंचालक, बीटीव्ही

 

B. उद्घाटन/अनावरण/घोषणा झालेल्या प्रकल्पांची सूची.

1. मैत्री विद्युत प्रकल्पाचे  अनावरण - रामपाल, खुलना येथील 1320 (660x2) मेगावॅट सुपर क्रिटिकल कोळशावर आधारित औष्णिक विद्युत  प्रकल्पासाठी अंदाजे 2 अब्ज अमेरिकी डॉलर्स खर्च अपेक्षित असून यापैकी 1.6 अब्ज अमेरिकी डॉलर्स विकास सहाय्य म्हणून भारताने सवलतीचा अर्थपुरवठा योजनेअंतर्गत  दिले.   

2. रुपशा पुलाचे उदघाटन - 5.13 किमी. लांबीचा रुपशा रेल्वे पूल हा 64.7 किमी लांबीच्या खुलना- मोंगला बंदर सिंगल ट्रॅक ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे प्रथमच मोंगला बंदर खुलनाशी रेल्वेने जोडले जात असून त्यानंतर ते मध्य आणि उत्तर बांग्लादेशबरोबर तसेच भारताच्या सीमेवरील पेत्रापोल आणि गेदे या पश्चिम बंगालमधील भागाशी जोडले जात आहे.

3. रस्ते बांधकाम उपकरणे आणि यंत्रसामग्रीचा पुरवठा- या प्रकल्पामध्ये, बांग्लादेश रस्ते आणि महामार्ग विभागाला 25 पॅकेजेसमध्ये रस्त्यांची देखभाल आणि बांधकामाची उपकरणे आणि यंत्रसामग्रीचा पुरवठा याचा समावेश आहे.  

4. खुलना-दर्शन रेल्वे मार्ग जोडणी प्रकल्प- हा प्रकल्प सध्याचीपायाभूत सुविधा (ब्रॉडगेज मार्गाचे दुपदरीकरण) अद्ययावत करण्यासंदर्भात आहे. दोन्ही देशांमधील सीमापार जाणारी सध्याची   रेल्वेसेवा गेदे -दर्शन येथे खुलनाला जोडून त्याद्वारे दोन्ही देशांमधील रेल्वे जोडणी , विशेषतः ढाका तसेच भविष्यात मोंगला बंदराशी दळणवळण यामुळे वाढेल. या प्रकल्पासाठी अंदाजे 312.48 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स खर्च अपेक्षित आहे.

5. पर्बतीपूर-कौनिया रेल्वे मार्ग- सध्याच्या मीटर गेज मार्गाच्या  दुहेरीकरणाच्या    या प्रकल्पासाठी अंदाजे 120.41 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प दोन्ही देशांमधील सध्याच्या  रेल्वे मार्गाला बिरोल (बांग्लादेश) – राधिकापूर (पश्चिम बंगाल) येथे जोडला जाईल आणि द्विपक्षीय रेल्वे संपर्क वाढवेल.


* * *

S.Kakade/R.Aghashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1857190) Visitor Counter : 256